खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
आज चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचा निवेदन: आबिद अली
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:-महासंघामार्फत १. उत्पादकता ७.५ क्विंटल वरून १२ ते १५ क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत वाढविणेबाबत, 2. ई पीकपेरा ऐवजी तलाठी हस्तलिखित सही शिक्का असलेला पीकपेरा स्वीकारणे बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी , चंद्रपूर, जिल्हा मार्केटिंग अधिकारी ,यांची भेट घेतली असता भयंकर प्रकार लक्षात आला. यामध्ये जिल्हा अधीक्षकांनी ८ क्विन्तल प्रति हेक्टर पाठविला. तो आज कागदपत्रे बदलविण्यास भाग पडून 12 क्वि. करण्यात आला. त्यामुळे आज महासंघाचे अध्यक्ष नरेंद्रभाऊ जीवतोडे, व संचालक यशवंत सायरे, स, आबीद अली हिरालाल बघेले, डॉ. निलेश पावडे, सतीश बावणे, गणेश आमने यांचे कार्य कौतुक करण्यासारखंच आहे.
मागील अनेक वर्षापासून चंद्रपूर जिल्हयाची हरभरा उत्पादकता जुनेच आकडे कृषी महसूल व पंचायत या विभागाला पाठवण्यात येत असल्याने यावर्षी वैनगंगा व्हॅली शेतकरी कंपनी महासंघ चंद्रपूरचे वतीने मागील अनेक निवेदनाद्वारे जिल्हयाची हरभरा उत्पादकता वाढविण्याचे सुचविण्यात आले. कृषी विभागाने या वर्षी जिल्हा नियोजन सभागृहामध्ये जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या उपस्थितीमध्ये किमान 12 क्विंटल हेक्टरी म्हणजेच एकरी साधारण पाच क्विंटल हरभरा उत्पादकता करण्याचे जाहीर झाले. हरभरा उत्पादकता यादीमध्ये चंद्रपूर जिल्हा उत्पादकता फक्त 7.5 क्वी म्हणजे तीन क्विंटल एकरी पाठवण्यात आली. मागील अनेक वर्षापासूनच तेच ते आकडे कृषी विभागामार्फत पाठवण्यात आल्याने शासन स्तरावर जिल्ह्याची उत्पादकतेत वाढ होत नाही. त्यामुळे जिल्हयातील सर्व हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासकीय हरभरा खरेदीचे धोरण असे आहे की ग्राम स्तरावर तालुक्यातून साधारण दहा गावाची निवड हरभरा पिक उतारा तपासणीसाठी randam पद्धतीने केली जाते. त्यातील सहा गावातील महसूल विभाग, दोन गावातील पंचायत विभाग आणि दोन गाने कृषी विभागामार्फत तपासण्याकरता दिले जाते. शेताच्या सर्वे नंबर येतो त्या शेतकन्याच्या शेतीतील दहा फूट बाय दहा फूट हरभरा कापून त्याचे ज्या कुटार व हरभरा वेगला करून वजन केल्या जाते व त्या अनुषंगाने हेक्टरी प्रमाण काढले जाते. त्यामध्ये ग्रामसेवक सरपंच व ग्राम स्तरावरील समितीचे साक्षीने तपासणी करावी लागते. परंतु तसे न होता अंदाजीत आकडे भरल्या जाते मागील अनेक वर्षापासून अंदाजे आकडे भरल्या जात असल्यामुळे तेच ते आकडे शासनाला पाठवण्यात येत आहे. या प्रक्रियेत सर्व गावातून तालुक्याचे उत्पन्न ठरवल्या जाते अहवाल जातो जिल्हाचा कृषी विभाग जिल्ह्याचा सरासरी आकडा घोषित करतो. जिल्हयाचे आकडे राज्याला जाते व राज्य सरसकट जिल्हयाची हरभरा उत्पादकता निश्चित करते त्यानुसार केंद्र सरकारची नाफेड यंत्रणा जिल्हयातील खरेदी सुरू करते, चंद्रपूर लगतच्या जिल्हयामध्ये यवतमाळ वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया येथे मात्र बारा ते पंधरा जाहीर केलेली आहे. आज चंद्रपूर जिल्हयातील हरभरा उत्पादकता एकरी आठ ते बारा वर हरभरा उत्पादन घेत असतात. चुकीचे उत्पादन आकडे पाठवल्यानं शासन फक्त तीन क्विंटल एकरी हरभरा खरेदी करते. त्यामुळे एकरी दहा क्वि. कुठे विकायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. व उरलेला हरभरा अतिशय कमी भावाने व्यापारी खरेदी करून शेतकन्यांचे अतोनात नुकसान करत आहे. यामध्ये शेतकरी अडचणी सापडलेला आहे. एकीकडे शासन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची धडपड करत असताना चुकीच्या नियोजनामुळे पिकवलेले उत्पादन कमी होत आहे. करिता जिल्हयाच्या संबंधित यंत्रणेमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. यावर्षीची चंद्रपूर जिल्हयाची हरभरा उत्पादकता न वाढल्यास शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी ही विनती.
जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांचा महासंघ स्थापन झाल्यामुळे शेतकऱ्यांशी संबंधित समस्यांना वाचा फुटेल तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर विदर्भातील राजकारणी पण शेतकऱ्यांना महत्व देतील अशी अपेक्षा करतो
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...