Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *रामपूर-माथरा-पोवनी...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*रामपूर-माथरा-पोवनी रस्ता जडवाहतुक बंदीस मुदतवाढ* अवजड वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे प्रशासनाचे निर्देश; ३१ मे पर्यंत जडवाहतुक राहणार बंद

*रामपूर-माथरा-पोवनी रस्ता जडवाहतुक बंदीस मुदतवाढ*    अवजड वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे प्रशासनाचे निर्देश; ३१ मे पर्यंत जडवाहतुक राहणार बंद

अवजड वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे प्रशासनाचे निर्देश; ३१ मे पर्यंत जडवाहतुक राहणार बंद

 

राजुरा, ता. २७ : मागील दोन वर्षांपासून पोवनी-गोवरी-रामपूर - राजुरा रस्त्याचे काम सुरू आहे. जडवाहतुकीमुळे रस्ता बांधकाम करण्यास अडचण निर्माण होत आहे. यामुळे या मार्गावरील जड वाहतूक बंद करणे आवश्यक आहे. रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने या रस्त्यावरील जड वाहतूक बंद करण्याची मागणी केली. त्यानुसार बांधकाम विभागाने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे जडवाहतूक बंद करण्यासंबंधी विनंती केली. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यामार्गावरील जडवाहतूक तीन महिन्यांकरिता बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले होते. मात्र या रस्त्यावरील पुलाचे बंधकाम सुरू असल्याने जडवाहतुकीमुळे लहान वाहनांना त्रास होऊ नये व अपघात घडू नये याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या मार्गाला ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

 

पोवनी ते रामपूर हे अंतर सात  किमीचे आहे. या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या मशिनरीचा वापर होत आहे. रस्ता बांधकाम करताना जडवाहतूक सुरू ठेवणे धोकादायक आहे. जडवाहतूक सुरू ठेवल्यास लहान वाहनास येण्या- जाण्याकरिता रस्ता अपुरा पडत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे अवजड वाहतुकदारांना राजुराकडून पडोलीकडे येण्यासाठी राजुरा-रामपूर-सास्ती-पोवनी-हडस्ती-देवडा-दाताळा-पडोली या मार्गाचा वापर करता येईल. तसेच पडोलीकडून राजुराकडे जाण्यासाठी जडवाहतूकदारांना पडोली-दाताळा-देवाडा-हडस्ती-पोवनी-सास्ती-रामपुर-राजुरा या मार्गाचा वापर करता येणार आहे. पोवनी गोवरी ते राजुरा हा रस्ता जड वाहनांकरिता पूर्णपणे तीन महिने बंद होता. काम पूर्ण न झाल्याने वाढीव तीन महिन्यांकरिता बंद करण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने विनंती केली होती. त्याअनुशंगाने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी १ मार्च २०२३ ते ३१ मे २०२३ पर्यंत सर्व प्रकारच्या जडवाहनांना वाहतुकीस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...