Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / *शेणगाव येथे ग्राम महोत्सव...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

*शेणगाव येथे ग्राम महोत्सव 2023 निम्मित विविध कार्यक्रम संपन्न*

*शेणगाव येथे ग्राम महोत्सव 2023 निम्मित विविध कार्यक्रम संपन्न*

 

 

 

चंद्रपूर:- चंद्रपूर तालुक्यातील शेनगाव हे नेहमी विविध उपक्रमाने परिचित गाव आहे. समस्त शेणगाव वासियांनी 2023 हे वर्ष स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निम्मित विविध *ग्राम उत्सव* ने साजरे करण्याचे ठरले. त्यात गावातील ग्रामपंचायत, विविध समिती, संघटना, मंडळ यांनी एकत्र येत विविध उपक्रमाची जबाबदारी घेत विविध कार्यक्रम आयोजित केले होते.  

 

   जानेवारी महिन्यामध्ये ग्रामपंचायत आयोजित  *जिजाऊ- सावित्री दशरात्रौत्सव* निमित्त 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती पासून तर 12 जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

त्या कार्यक्रमांमध्ये महिला आणी लहान मुलांचे मॅरेथॉन, भारूड, शेती विषयक मार्गदर्शन, उद्योजक मार्गदर्शन, भजन संमेलन आणी सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम संपन्न झाले.

फेब्रुवारी महिन्यामध्ये 4 व 5 फेब्रुवारीला *वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यस्मरण महोत्सव* चे आयोजन श्री गुरुदेव सेवा मंडळ, शेणगाव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये लहान विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासाकरिता संत महापुरुषांचे विचार मुलांमध्ये रुजवण्याकरिता वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संत महापुरुषांचे विचार जनमाणसांपर्यंत पोहोचवण्याकरिता भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याकरिता भजन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ. प आकाशजी तावडे महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला आणी  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रतिमेची शोभायात्रा संपूर्ण गावामध्ये सर्व जनतेच्या उपस्थित काढण्यात आली आणि शेवट ग्रामपंचायतचे माहितीचे अधिकार सांगण्याकरिता मा. नरेंद्र जीवतोडे रा. नंदोरी यांनी मार्गदर्शन केले तर  कार्यशाळेमध्ये  मा. रामरावजी घुमणर रां.कादली जी.यवतमाळ  यांचे विषमुक्त शेती याच्यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी काल्याचे किर्तन हरिभक्त परायण कापटे महाराज यांचे झाले महाप्रसादाने कार्यक्रम संपन्न झाला.

त्यानंतर 12,13व 14 फेब्रुवारीला जय बजरंग क्रीडा मंडळ, सेनगाव आयोजित *भव्य पुरुषांचे कबड्डी सामन्यांचे* आयोजन करण्यात आले होते,  या आयोजनात प्रथम बक्षीस. जय बजरंग क्रीडा मंडळ कोंडा तर द्वितीय बक्षीस जय बजरंग क्रीडा मंडळ सेनगाव,  तृतीय बक्षीस- न्यू आदर्श क्रीडा मंडळ गोरजा आणी चतुर्थ बक्षीस-शिवाजी राजे क्रीडा मंडळ घोनाड या चार मंडळांनी  बक्षीस पटकावले.

त्यानंतर 16 फेब्रुवारीला आचार्य वेरुळकर गुरुजी यांच्या जन्मदिवसानिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे *संस्कार दिन* म्हणून साजरा करण्यात आला या संस्कार दिनामध्ये संस्कार किती महत्त्वाचे असतात..?  यांच्यावर युवा व्याख्याते मा.  राजदादा घुमणार यांचे मार्गदर्शन झाले.

 18 व 19 फेब्रुवारीला छत्रपती महोत्सव समिती द्वारा आयोजित *छत्रपती महोत्सवा* चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये *रक्तदान शिबिर* घेण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे दोन महिलांनी सुद्धा आपलं रक्तदान केले. सायंकाळला सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य *नयनपाल महाराज शिंदोला* यांचे सप्त खंजिरी कीर्तनातून अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, ग्राम स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मता, अशा विविध विषयावर समाज प्रबोधन केले.  19 फेब्रुवारीला सकाळी युवकांसाठी युवतींसाठी *शिव दौड* स्पर्धा चे आयोजन केले होते.  सायंकाळला छत्रपती शिवाजी महाराज यांची घोड्यावर  बसून गावामधून *भव्य मिरवणूक* काढण्यात आली आणी शेवटी कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.

 

त्यानंतर 21 फेब्रुवारीला *शेनगाव चा राजा गणेश मंडळ* यांच्या सौजन्याने *लोक काय म्हणतील..?* या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.

 23, 24 व 25 फेब्रुवारीला ग्रामवासियांच्या  सहकार्यातून *जंगी इनामी शंकर पटा* चे आयोजन करण्यात आहे होते, या शंकरपटामध्ये पहिल्या दिवसाला संजय पिंपळशेंडे रा. लोणी यांनी स्पेशल बक्षीस पटकावले. तर दुसऱ्या दिवशी अ गटामधून आशाबाई गोहने, सोनेगाव  यांनी बक्षीस पटकावले तर ब गटामधून साक्षी रत्नपारखी, चिंचोली यांनी स्पेशल बक्षीस पटकावले तरी. तर क गटामधून संजयभाऊ पिंपळशेंडे, लोणी यांनी स्पेशल बक्षीस पटकावलेले आहे.

 

हा संपूर्ण कार्यक्रम ग्रामपंचायत, संभाजी ब्रिगेड, तंटामुक्त  शालेय व्यवस्थापन् समिती, श्री. गुरुदेव सेवा मंडळ, शेणगाव चा राजा गणेश मंडळ, जय बजरंग क्रीडा मंडळ या सर्व संघटना आणी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून व समस्त ग्रामवासियाच्या  सहकार्यातून संपन्न झाले.

*गाव हा विश्वाचा नकाशा.!*

*गावावरून देशाची परीक्षा.!*

*गावची भंगता अवदशा.!*

*येईल देशा..!*

या कार्यक्रमातून समस्त ग्रामवासियांचा सर्वागिन् विकास व्हावा हा उद्देश नेहमी असतो.. हे विशेष..

ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...