वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
चंद्रपूर/राजुरा :-यवतमाळ जिल्ह्य़ातील घाटंजी तालुक्यातील मौजा सावंगी संगम येथे भोईराज भोई तत्सम जातीचे सर्वेक्षण करण्याकरता सेवाभावी वृत्तीच्या व्यक्तींच्या पथका द्वारे सामाजिक न्याय देण्याच्या भूमिकेतून भोईराज भोई तसम जातीचे सर्वेक्षण करून समाजातील जवळपास ३३ पोट जाती व उपपोटजातितील लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पथक सर्वेक्षणात मार्गदर्शक म्हणून कळमनाचे सरपंच, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस, ओबीसी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा ऍग्रो डिलरस असोसिएशन राजुराचे अध्यक्ष नंदकिशोर वाढई, बाळकृष्ण गोंदे, शाखा अध्यक्ष बल्लारपूर, कृष्णाजी भोयर विभागीय सरचिटणीस नागपूर विभाग, प्रा. डॉ. रवी केवट महिला महाविद्याय बल्लारपूर, नारायण आगीरकर कळमना बु, ज्येष्ठ नागरिक गंगाधर जी वाघाडे, तालुकाध्यक्ष गोडपिपरी या सगळ्या मान्यवरांनी सावंगी संगम, अर्ली, राम नगर, कारेगाव, सागदा, नारायण पेठ, राज्य पेठ, कुर्ली, हिवरी, सावरगाव, धामणधरी या यवतमाळ जिल्ह्यातील गावांमध्ये जाऊन पथकाद्वारे सर्वेक्षण करून कुठलाही भोईराज भोई तत्संम जातीतील पोट जातीमधील व्यक्ती महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय सोयी सवलती पासून वंचित राहता कामा नये याकरिता सामाजिक बांधिलकी जोपासत समाज कार्य करणारे हि सगळी मंडळी पथका द्वारे समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तसेच या समाजाच्या उपजाती आढळल्यास आमच्या पथकाला यांची माहिती पोहोचावी जेणेकरुन या पोट जातीतील लोकांना NT जातीचे महाराष्ट्र शासनाचे लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करता येईल असे आवाहन या पथकाने केले आहे.
त्यांच्या या कार्यपद्धतीला भोईराज भोई तत्संम जातीतील लोकांकडून उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत असून समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. याप्रसंगी सरपंच सावंगी संगम व्यंकटम श्रीनिवास कदेवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मधूकर बोरकर संस्कार बोरकर, देवराव अगिरकर, यादव रावते, रामकिशन अगिरकर, महेश अगिरकर, रामदास बोरकर, अशोक बोरकर, सखाराम रावते, विठ्ठल बावणे, रवींद्र रावते, पुणाजी रावते, पिसाराम रावते इस्तरी बोरकर, प्रकाश रावते, मोहन बोरकर यासह अनेकांची उपस्थिती होती.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...