Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / धोबी परीट जनकल्याण...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

धोबी परीट जनकल्याण संस्था घुग्घुसतर्फे कर्मयोगी श्री संत गाडगे महाराजांच्या १४७ व्या जयंती महोत्सवाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न

धोबी परीट जनकल्याण संस्था घुग्घुसतर्फे कर्मयोगी श्री संत गाडगे महाराजांच्या १४७ व्या जयंती महोत्सवाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न

 

 

घुग्घुस : येथील धोबी परीट जनकल्याण संस्थेतर्फे कर्मयोगी श्री संत गाडगे महाराजांची १४७ व्या जयंती महोत्सवाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, २४ फेब्रुवारीला संत गाडगे महाराज स्मारक भवन, वार्ड क्रमांक ६ जनता महाविद्यालय रोड, घुग्घुस येथे थाटात संपन्न झाला.

 

कार्यक्रमाचे उद्घाटक भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, प्रमुख पाहुणे म्हणुन, डी. डी. सोनटक्के, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य धोबी परीट सर्व भाषिक महासंघ, भय्याजी रोहनकर, प्रदेश उपाध्यक्ष, अनिल तुंगीडवार, विश्वनाथ मुक्के अध्यक्ष धोबी समाज चंद्रपूर, माजी जि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, नकोड्याचे सरपंच किरण बांदूरकर, भाजपाचे साजन गोहने, महेश लठ्ठा, संजय भोंगळे उपस्थित होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

सकाळी भजन कार्यक्रम, प्रबोधनकार कैलास महाराज खडसाने यांचे कीर्तन, सायंकाळी महाप्रसाद असे कार्यक्रम घेण्यात आले.

गुरुवार, २३ फेब्रुवारीला सकाळी गजानन चिंचोलकर महाराज यांच्या हस्ते प्रतिमेची पुजा व घटस्थापना, ग्राम स्वच्छता अभियान व रॅली, रात्री उदयपाल वणीकर महाराज यांचे भव्य कीर्तन असे कार्यक्रम घेण्यात आहे.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष सचिन क्षीरसागर, उपाध्यक्ष विलास भोस्कर, सचिव निलेश मुक्के, कोषाध्यक्ष बाबाराव बोबडे, सहसचिव रामू भसारकर, सहकोषाध्यक्ष बंडू तुराणकर, संघटक बबन पत्रकार, शेखर तंगल्लापेल्ली, बंटी भोस्कर, चंदन तुराणकर, रामदास क्षीरसागर, विजया बंडेवार, गीता क्षीरसागर, शीतल क्षीरसागर, रंजना भोस्कर, वंदना क्षीरसागर, मीनाक्षी दाढे, कल्पना तुराणकर, माधुरी क्षीरसागर यांनी प्रयत्न केले.

यावेळी मोठ्या संख्येत धोबी परीट समाज बांधव उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...