Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / सुधीर मुनगंटीवार सेवा...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रात वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराजांना अभिवादन

 सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रात वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराजांना अभिवादन

संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेची शिकवण भारताला आधुनिकतेकडे नेणारी - विवेक बोढे

 

 

 

 

घुग्घुस : येथील  सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रात गुरुवार, २३ फेब्रुवारीला वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.

 

यावेळी बोलतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले, वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज कोणत्याही गावात सकाळी पाऊल टाकताच आधी आपल्या हातातील झाडूने गावात स्वच्छता करायचे नंतर सायंकाळी कीर्तनाने प्रबोधन करायचे. संत गाडगे महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी लोक सर्वकाही विसरून गर्दी करायचे. असे संत गाडगे महाराजांचे जीवनाचे व सेवेचे कार्य होते.

संत गाडगे महाराजांनी स्वच्छता व कीर्तनाच्या माध्यमातून वैचारिक क्रांती समाजात घडविली. दररोज सकाळ होताच  संत गाडगे महाराजांच्या हातात खराटा असायचा खराटा घेऊन गावाची स्वच्छता करणे, परिसराची स्वच्छता करणे, आणि रात्री आपल्या कीर्तनातून जनजागृती करणे हा महाराजांचा दिनक्रम होता त्यांनी स्वच्छतेची शिकवण देऊन देहश्रमाची पराकाष्ठा केली.

 

कर्मयोगी संत गाडगे महाराजांच्या

१४७ व्या जयंती महोत्सवानिमित्त  धोबी परीट जनकल्याण संस्था घुग्घुसतर्फे शहरातून ग्राम स्वच्छता अभियान रॅली काढण्यात आली. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रा जवळ रॅलीचे आगमन होताच भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी धोबी परीट समाज बांधवांचे स्वागत केली. तसेच धोबी परीट समाज बांधवांनी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराजांना अभिवादन केले.

 

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे सिनू इसारप, संजय भोंगळे, गुड्डू तिवारी, शाम आगदारी, धोबी परीट समाजाचे सचिन क्षीरसागर, विलास भोस्कर, निलेश मुक्के, बाबाराव बोबडे, रामूजी भसारकर, शेखर तंगल्लापेल्ली, बंटी भोस्कर, चंदन तुराणकर, विजया बंडेवार, गीता क्षीरसागर, शीतल क्षीरसागर, रंजना भोस्कर, वंदना क्षीरसागर, मीनाक्षी दाढे, कल्पना तुराणकर व मोठया संख्येत समाज बांधव उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...