वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
सातपुते प्रकरणाची पुनरावृत्ती माहिती अधिकारात माहिती देण्यास टोलवा - टोलवी
घुग्घूस : चांदा शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत जनता विद्यालय साखरवाही येथील सहाय्यक शिक्षक तसेच भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा उपाध्यक्ष व घुग्घूस अध्यक्ष विवेक बबनराव बोढे यांनी मुख्याध्यापिका वैशाली पेटकर यांच्या सोबत संगनमताने शाळेत आपल्या ठिकाणी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवणी करीता शुभम कोयडवार या युवकाला मासिक भांड्यावर ठेवले याप्रकरणाची गुप्त तक्रार पालकांनी काँग्रेस कार्यालयात केली असता काँग्रेस नेते व पत्रकार यांनी संयुक्तपणे शाळेला भेट दिली असता नकली शिक्षकाने काँग्रेस नेत्यांना पाहून पळ काढला व या प्रकरणाचा भांडाफोड झाला आहे
यानंतर सत्ता पक्ष तसेच शिक्षण संस्था व मुख्याध्यापिका यांनी फ्राड शिक्षकांवर कारवाई करण्या ऐवजी सदर प्रकरण दाबण्यासाठी
आपली पूर्ण शक्ती प्राणपणाला लावली.
काँग्रेस शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांनी दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 अनव्ये खालील माहिती मागितली जनता विद्यालय साखरवाही शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांची नावे व पत्ता,शिक्षकांच्या हजेरी बुकाची सत्यप्रत,शिक्षकांची शिकवणी वेळेनुसार वेळापत्रक ही शाळेशी संबंधित मागणी केली असता माहिती अधिकारी तथा मुख्याध्यापिका यांनी ही माहिती शाळेतील शिक्षकांची वैयक्तिक स्वरूपाची असल्याने व शाळेतील शिक्षकांनी त्यांची वैयक्तीक माहिती देण्यास लेखी संमती न दिल्यामुळे आपणास माहिती पुरवू शकत नाही असे धांदात खोटे व प्रकरण दाबण्यासाठी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
वर्ष 2016 ते 2017 मध्ये ही साखरवाही शाळेने गोपाळ दिनाजी सातपुते यांनी तत्कालीन मुख्याध्यापक व माहिती अधिकारी जगदीश बाबुराव मत्ते यांना शाळे संबंधित माहिती मागितली होती त्यांना ही रेड्डी यांच्यासारखे समान उत्तर पाठविण्यात आले त्यांनी याविरोधात अपील केली अपील अधिकाऱ्यांनी माहिती देण्यासाठी सुचविले असता ही या मुजोर प्रशासनाने माहिती दिली नाही या विरोधात सातपुते यांनी राज्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर नागपूर खंडपीठ यांच्याकडे द्वितीय अपील दाखल केली व यात सातपुते यांच्यावतीने निर्णय आला या शिक्षण संस्थे विरोधात रेड्डी यांनी कडवी झुंज देण्याचा निर्णय करीत दिनांक 22 फेब्रुवारी रोजी प्रथम अपील दाखल केली असून रस्त्यावर तथा कायदेशीर लढा देण्याचा इशारा रेड्डी व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...