वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
चंद्रपूर/राजुरा:-राज्य सरकारने केलेल्या फसवणुकीच्या विरोधात दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपला आमदार सुभाष होते यांनी पाठिंबा देऊन येणाऱ्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून आज राजुरा येथे हजारो अंगणवाडी सेविका, कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात एकत्रितपणे संघर्ष करीत होत्या. या आंदोलनस्थळी भेट देऊन आ. धोटे यांनी आपला पाठिंबा जाहीर करून संबोधित केले. राज्यातील कार्यरत अंगणवाडी कर्मचारी यांच्या गेली चार वर्षाचा कार्यकाळ लोटून गेला असताना सुद्धा अनेक मागण्यांकडे राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणारी ग्रॅज्युएटी अंगणवाडी महिलांना मिळणारा सेवानिवृत्तीनंतरचा लाभ यास होणारा विलंब तसेच पगार वाढ इत्यादी मागण्यांना घेऊन अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून महिला कर्मचारी गेली अनेक वर्षापासून सातत्याने लढा देत आहेत परंतु सरकारला मात्र जाग येत नाही. आंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची घोषणा २६ जानेवारीला करण्याबाबत सरकारने आश्वासित केले होते परंतु प्रत्यक्षात घोषणाची अंमलबजावणी न करता दोन लाख अंगणवाडी महिलांची झालेल्या या फसवणुकीच्या विरोधात २० फेब्रुवारी २०२३ पासून राज्यातील दोन लाख अंगणवाडी महिलांनी संप पुकारला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजुरा येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपात आपला सहभाग नोंदवून दिनांक २२ फेब्रुवारी रोजी आमदार सुभाष धोटे यांना आपले निवेदन दिले. या निवेदनाची दखल घेत येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात सरकारला जाग आणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यास भाग पाडू असे आश्वासन संपकऱ्यांना आमदार सुभाष धोटे यांनी दिले आहे.
या प्रसंगी कॉम्रेड प्रा. रमेशचंद्र दहिवडे, कॉम्रेड किशोर जामदार, शारदा लेनगुरे, विमल गावंडे, राधा सोनकुवर, सुरेखा तितरे विद्या नीब्रँड व राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व जिवती तालुक्यातील हजारोच्या संख्येने अंगणवाडी महिला कर्मचारी उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...