Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / चुनखडी उत्खनन क्लोज...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

चुनखडी उत्खनन क्लोज माईन्स झोल कर्नाटकापेक्षाही माणिकगडचा मोठा चुनखडी घोटाळा

चुनखडी उत्खनन क्लोज माईन्स झोल  कर्नाटकापेक्षाही माणिकगडचा मोठा चुनखडी घोटाळा

चुनखडी उत्खनन क्लोज माईन्स झोल

कर्नाटकापेक्षाही माणिकगडचा मोठा चुनखडी घोटाळा

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

चंद्रपूर/कोरपना : चंद्रपूर जिल्ह्यातील हैद्राबाद निजाम राजवटीत राहिलेला हैद्राबाद शासनाचा फसली नकाशा १९३६ चक्री नकाशा १९५४ व बंदोबस्त नकाशा असे तीन वेळा कुसुंबी या गावाची भूमापन मोजणी गाव नमुना गोषवारा यामध्ये सविस्तर नोंदी, महसुली अभिलेखात आहे. तसेच गाव गोषवारा व वन विभागाच्या मालकीची ४ हेक्टर ५० आर जमिनीचा सातबारा आहे.मात्र यागावातील गवरमेंट ऑफ हैद्राबाद ८ आक्टोंबर १९५३ ला अधिसूचना प्रशीध्द करण्यात आली. त्यामध्ये कुसुंबी गावाची व खाजगी जमिनीची नोंद आहे असे असताना मात्र लिज मध्ये लिज करार करताना सर्व जमिनी वन विभागाच्या दाखवण्यात आल्या.वन अधिनियम १९८० वन कायदा अमलात असताना वन पर्यावरण मंत्रालय यांची रीतसर परवानगी व त्यामध्ये अटी व शर्ती भंग करीत कृती पूर्तता पूर्ण करण्यात आलेले नाही. तसेच कंपनी दर पाच वर्षाने मायनिंग नियोजन शासनाला सादर करतील.मात्र गेल्या १५ वर्षात मायनिंग प्लान ची अंमलबजावणी तसेच १९९३ते ९४ मध्ये १ माईन्स क्लोजर दाखविण्यात आले.मात्र ती माईन्स अजूनही उत्खनन सुरु असून वाटर रीझार्वेशेन रिक्लेमेशेन करून क्लोज केलेली नाही.मात्र कागदोपत्र दाखविण्यात आल्याची भ- विज्ञान व  खनिकर्म संचनालय महारष्ट्र शासन यांच्या कार्यालयाने २८ जून २०१९ ला ३०२.५८ हेक्टर खदान १९९३ ते ९४ मध्ये क्लोज दाखविण्यात अली मात्र प्रत्य्क्षात एकही खदान क्लोज झाली नसून आज चारही खदान येथून मोठ्या प्रमाणात अविरत चुनखडी उत्खान्नन सुरु आहे. मायनिंग प्लान आणि वर्किंग प्लान यामध्ये मोठी तफावत असून मंजूर सर्वे.नं.खसरा व क्षेत्राबेहेर उत्खनन होत असताना खनिकर्म विभागाकडून चुकीच्या नोंदी दाखवत आहे. GPS व ड्रोन सर्वेक्षण केल्यास मान्यता कुठे व उत्खनन कुठे झाले याचा मोठा घोटाळा उघड होणार आहे.कंपनी पूर्वी गडचांदूर येथे १ युनिट चालवीत होती त्या ठिकाणी दोन युनिट सुरु झाले तसेच या कंपनीकडून ५०० टन अल्ट्राटेक आवारपूर कंपनी पाठवल्या जात आहे. तर सोनार बंगाल ,पश्चिम बंगाल येथे रेल्वे व्यागन द्वारे पाठविल्या जाते १९८४-९० चा रोयाल्तीचा तपशील भूविज्ञान व खनिकर्म विभागाकडे नसल्याचे कळविले आहे.१९९२ते २०१३ पर्यंत एकच युनिट चालवीत असताना १२ कोटी रोयाल्टी च्या रूपाने कंपनी कडून शासनाला भरणा केल्या जात होती.त्यानंतर रोयाल्टी चे दर वाढले व कंपनीचे चुनखडीचे उत्खनन चार पट वाढले सामान्य लोंकाच्या १ ट्रॅकटर रेती व मुरूम करिता लाखो रुपयापेक्षा अधिक दंड ठोठावणारा हा महसूल व खनिकर्म विभाग मंजूर क्षेत्रावर उत्पन्न होताना मायनिंग याचे उलंघन होत असताना ड्रोन सर्वेक्षण GPS रीडिंग करण्याची अनेक वेळाची मागणी असताना सुद्धा चौकशी केल्या जात नाही. नियमाचे सर्रास उलंघन कंपनी करीत असताना चौकशी केल्या जात नाही असा तक्रार वजा आरोप सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबिद अली यांनी केला असून खनिकर्म विभाग यांच्याकडे प्रलंबित तक्रारीची मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...