वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
चंद्रपूर / राजुरा : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते जननायक राहुलजी गांधी यांनी भारत जोड़ो यात्रेच्या माध्यमातून व्यापक जनसंपर्क करून जनतेच्या मनातील भावना, वेदना, व्यथा, अपेक्षा सर्व जानून घेतल्या आणि यात्रेदरम्यान आलेले अनुभव, जनतेचे प्रश्न घेऊन त्यांनी संसदेच्या पटलावर ठेवले. राहुलजींचे विचार, अनुभव लोकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्यासाठी काँग्रेस नेते, माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळुभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पासून चंद्रपूर जिल्ह्य़ात युवक काँग्रेस हात से हात जोडो अभियान सुरू करीत असल्याची माहिती चंद्रपूर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांनी दिली आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रातून या अभियानाला सुरूवात होऊन पुढे जिल्हय़ातील सर्व विधानसभा क्षेत्रात हे अभियान राबविण्यात येणार आहे.
ते पुढे म्हणाले की, आता पर्यंत युवक काँग्रेसने चंद्रपूर जिल्ह्य़ात जवळपास १०० युवक काँग्रेसच्या शाखा गठीत करून मोठय़ा उत्साहाने जनसंपर्क, जनसेवेच्या कामाला सुरुवात केली आहे. तसेच त्यांच्या माझे गाव माझी शाखा या उपक्रमातूनही हजारो युवक काँग्रेसशी जुडून पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवित आहेत. आजपासून सुरू झालेल्या हात से हात जोडो अभियानातून युवक काँग्रेसच्या कामाला अधिक गतिमान करून जिल्हात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. एवढेच नव्हे तर राहुलजींचा पुढील संदेश की, आपल्यामधील द्वेष आणि भांडणे देशाच्या विकासातील अडथळे आहेत. आपण सर्व जात, धर्म, प्रांत, भाषा या मतभेदांच्या वर उठून विविधतेत एकता ही ओळख पक्की करू. तसेच ते सांगतात की घाबरू नका आपल्या मनातील भीती काढून टाका सत्याला सामोरे जा- द्वेष आपोआपच समाजातून नष्ट होईल हा विचार सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी ही हात से हात जोडो अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच देशाला अंधारातून प्रकाशाकडे, द्वेषातून प्रेमाकडे आणि निराशेतून- आशेकडे नेणे, हे ध्येय साध्य करण्यासाठी भारताला महान संविधान देणाऱ्या महापुरुषांनी सांगितलेली तत्वे आणि मूल्ये यांना आदर्श मानून पुढे जाणे या प्रमुख बाबी आणि अधिकाधिक युवक व नागरीकांपर्यंत पोहचून काँग्रेसची विचारधारा, विविध विकासकामे आणि एकता, अखंडता, बंधुतेचा संदेश घेऊन आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने "हात से हात जोडो" हे अभियान राबवीत आहोत आपण सर्वांनी या मोहिमेत भाग घेऊन काँग्रेसच्या हाताला हात जोडून एक सुवर्ण भारताच्या उभारणी करीता आमची साथ द्यावी जिथे प्रत्येक भारतीयाला स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची समान संधी असेल चला तर मग, काँग्रेसच्या हातासे हात जोडो अभियानात सहभागी होऊन हे अभियान आणि आपले येणारे भविष्य उज्वल करू या असे आवाहन चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांनी केले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...