वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस येथील अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्त कुटुंबियांनी सोमवार, २० फेब्रुवारीला भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, नायब तहसीलदार सचिन खंडाळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, संजय तिवारी, संतोष नुने, सिनू इसारप, शाम आगदारी, मंडळ अधिकारी किशोर नवले, तलाठी कार्तिक आत्राम यांच्यसह शिवनगर परिसरातील पर्यायी जागेची पाहाणी केली.
घुग्घुस येथील अमराई वार्डात मागील वर्षी झालेल्या भुस्खलनाच्या घटनेनंतर स्थलांतरित कुटुंबांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे दिलासा मिळणार आहे. बाधित कुटुंबीयांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात याव्या अशा सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नियोजन भावनात पार पडलेल्या बैठकीत दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने वेकोलि वसाहतीच्या शिवनगर परिसरातील पर्यायी जागेची पाहाणी करण्यात आली आहे.
२६ ऑगस्ट २०२२ मध्ये घुग्घुस येथील अमराई वार्डात भुस्खलनाची घटना घडली होती.
या घटनेची गंभीर दखल घेऊन पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यासोबतच बाधीत कुटुंबांना घरपयोगी साहित्य, वैयक्तीक मदत करण्याबरोबरच मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत मिळवून दिली.
या घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून १६९ कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली होती. त्यानुसार १६९ पीडित कुटुंबीयांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे घरासाठी जागा निश्चित करून त्या ले-आऊटमध्ये रस्ता, वीज, पाणी आदींची सुविधा उपलब्ध करून त्या १६९ कुटुंबीयांची आदर्श नगरी तयार करण्यात येणार आहे. रमाई आवास, शबरी आवास, महाप्रीत योजना आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत घरे बांधून देण्यात येणार आहेत.
पाहाणी संपताच भुस्खलनग्रस्तांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे आभार व्यक्त केले. यावेळी मोठया संख्येत महिला व पुरुष उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...