रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
चंद्रपूर/राजुरा:-- रोटरी क्लब राजुराच्या वतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॉम्पिटिटिव्ह माईंड सेट या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन सरदार पटेल अभ्यासिका येथे करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर राजश्री मार्कंडेवार या लाभल्या होत्या तर मंचावर रोटरी क्लब राजुराचे अध्यक्ष नवल झंवर, सचिव कमल बजाज, रोटरी क्लब चंद्रपूरचे माजी अध्यक्ष श्रीकांत रेशीमवाले, सरदार पटेल अभ्यासिकेचे ग्रंथपाल प्रवीण बुक्कावार मंचावर विराजमान झाले होते.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. राजश्री मार्कंडेवार म्हणाल्या की, एमपीएससी, यूपीएससी ला संपूर्ण देशभरातून पाच लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात परंतु त्यापैकी 80 टक्के मुलांचा गोल हा सेट नसतो कोणी सांगितलं म्हणून किंवा आपल्या मित्रांनी यश गाठले म्हणून लोक स्पर्धा परीक्षेच्या मैदानात उतरतात त्यांचा गोल सेट नसतो. मग तो गोल कसा सेट करायचा याबद्दल मार्गदर्शन केले तसेच आपल्याला फिरायला आवडतं, पिक्चर बघायला आवडतो, चांगले जेवण करायला आवडतं, त्याचप्रमाणे अभ्यास करायला कशी आवड निर्माण होईल याबद्दल सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमादरम्यान सरदार पटेल अभ्यासिकेचा विद्यार्थी निखिल गौरकार हा महापारेषण द्वारे सहाय्यक अभियंता या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये राज्यात पहिला आला. त्याबद्दल त्याचा रोटरी क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन सारंग गिरसावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण ढुमणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करता प्रा. गणेश पेटकर, कवीश्वर खनके, ऋषभ गोठी, आनंद चांडक, निखिल चांडक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला सरदार पटेल अभ्यासिकेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...