Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / आमचं सरकार सत्तेत येताच...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

आमचं सरकार सत्तेत येताच जुनी पेन्शन योजना मंजूर करणार - माजी मंत्री वडेट्टीवार*

आमचं सरकार सत्तेत येताच  जुनी पेन्शन योजना मंजूर करणार - माजी मंत्री वडेट्टीवार*

*राजुरा येथे शिक्षक आ. अडबालेंचा सोहळा*

 

 

राजुरा…

लोकशाहीच्या नितीमुल्यावर आघात करुन देशात सर्वांना जगण्याचा समान हक्क मिळवून देणाऱ्या  पवित्र संविधानाला नामशेष करण्याचे षडयंत्र समाज विघातकप्रवृत्ती कडून रचले जात आहे. अशा प्रवृत्तींना थारा न देता देशात जनजागृतीसाठी हजारों किमी पायदळ प्रवासातून देश संघटित करू पाहणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना साथ देऊन देशातील अराजकातेला समुळ नष्ट करून राज्य व केंद्रात सत्ता परिवर्तन करा. आणि सत्ता परिवर्तन झाली की जुनी पेन्शन योजना लागू करुन न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.ते राजुरा येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तथा राजुरा विधानसभा काँग्रेस च्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या सत्कार सोहळा निमित्ताने उद्घाटक म्हणून बोलत होते.

 

आयोजीत सत्कार सोहळा कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष खा. बाळू धानोरकर, स्वागताध्यक्ष म्हणुन राजुरा  आ. सुभाष धोटे,  विधानपरीषद आ. अभिजित वंजारी, कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती  शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आ. सुधाकर अडबाले, तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघ अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे,  माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, कृउबा समिति कोरपनाचे श्रीधरराव गोडे, वि. मा. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष ठाकरे, उपाध्यक्ष श्रीहरी शेंडे, दादाजी लांडे, स्वामी येरोलवार , जी. म. स. बँक संचालक विजय बावणे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शांतनू धोटे, गडचांदुर नगराध्यक्ष सविता टेकाम, गोंडपिपरी नगराध्यक्ष सविता कुळमेथे, काँग्रेस ता. अध्यक्ष तुकाराम झाडे, व अन्य मान्यवर  मंचावर उपस्थित होते.

यापुढें मार्गदर्शनपर बोलतांना माजी मंत्री आ.वडेट्टीवार म्हणाले की, संपुर्ण जगाच्या इतिहासात ज्यांच्या पराक्रम व सतगुनी चारित्र्याची नोंद आहे.असे छत्रपति शिवाजी महाराज आपल्या राज्याच्या मातीत जन्मले हे आपले अहोभाग्यच. शिवबा राजांची लढाई अन्याया विरुद्ध होती. धर्माविरुद्ध नाहीं.आज धर्मा धर्मात विष पेरण्याचे काम सुरू आहे. या धर्मांधतेला थारा न देता सर्व धर्म समभाव धर्मनिरपेक्ष काँग्रेसला साथ देऊन पुनः देश उभरणीकरिता लढाईत सामील व्हा असे आवाहन करीत  जिल्हयात एकजुटीने व निष्ठेने पक्ष कार्य जबाबदारीने पार पाडल्यास संपुर्ण जिल्हा काँग्रेसमय निश्चित होईल अशी आशा यावेळी माजी मंत्री तथा आ. वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. अडबालेंचा विजय हा भाजप गडाला खिंडार पाडणारा आहे असेही ते म्हणाले.तर कौरवा व शकुनी डावा प्रमाणे जनतेशी छल कपट करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून बाहेर करा असे आवाहन खा. बाळू धानोरकर यांनी केले.

यानंतर नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आ.सुधाकर अडबाले यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला. धडाडीच्या नेतृत्वाला मतदारांनी संधी दिल्याने शिक्षकांच्या समस्या नक्कीच मार्गी लागतील व आ. सुधाकर अडबाले हे कसोटीवर खरे उतरतील असा विश्वास राष्ट्रीय ओबीसी महासंघ अध्यक्ष प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी यावेळी व्यक्त केला. तद्वतच शिक्षक मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळविलेले यश हे सांघिक कामगिरीचे फलीत असल्याचे मत सत्कार सोहळा स्वागताध्यक्ष आ. सुभाष धोटे यांनी व्यक्त केले. तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष असेच घवघवीत यश संपादन करेल असा दृढ विश्वास विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आमदार सुधाकर अडबाले म्हणाले की, माझा विजय हा माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुनिल केदार  यांनी घेतलेली "रिस्क' व दाखविलेला विश्वास, खा. धानोरकर,, आ. सुभाष धोटे व डॉ.तायवाडे यांचे सहकार्य आणि निवडणुकीत एकवटलेली शिवशक्ती- भीमशक्ती व कार्यकर्ते यांची पराक्रमी कामगीरी याची पावती होय. कार्यक्रमाचे सू्रसंचालन आनंद चलाख, प्रास्ताविक राजेश डाहुले यांनी केले. आयोजित  सत्कार सोहळा कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थितती होती.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...