Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / तर पालक मंत्राच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

तर पालक मंत्राच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

तर पालक मंत्राच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

शिक्षक असलेल्या भाजप प्रदेश उपाध्यक्षवर कारवाई करा

 

घुग्घूस  : शिक्षक पदावर असलेल्या भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष यांनी आपल्या जागेवर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी चक्क रोजंदारी माणूस ठेवला. हे प्रकरण उघडकीस आल्यावर शिक्षण विभागात एकच खडबड उडाली. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जवळचे असल्यानं शिक्षकावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. शिक्षक विवेक बोडे यांच्यावर कार्यवाही करा, मागणी घेऊन आज घुगुस येतील गांधी चौकात धरणे आंदोलन काँग्रेस तर्फे करण्यात आले. कारवाई न झाल्यास पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

 

भाजप प्रदेश उपाध्यक्ष असलेले  विवेक बोढे हे साखरवाही जनता विद्यालयात शिक्षक पदावर कार्यरत आहेत. राजकारण करता यावं यासाठी बोडे यांनी आपल्या जागेवर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी रोजंदारी माणूस ठेवला होता. हा प्रकार समोर आल्याने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली होती. हा प्रकार उघडकीस येऊन आज पंचवीस दिवस लोटले. मात्र अद्यापही शिक्षक, मुख्याध्यापिका व संस्था चालकांवर कारवाई करण्यात आलेली नाही. दोषी शिक्षक हा, भाजपाचा नेता असल्याने पालकमंत्री अभय देत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी करीत आज धरणे आंदोलन केले.

 

यावेळी विवेक बोढे मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.

शिक्षण क्षेत्राला कलंकित करणाऱ्या भाजप नेत्यावर तसेच संस्था चालकावर कारवाई कराच, अशी मागणी किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांनी केली. भाजप प्रदेश उपाध्यक्ष हा विद्यार्थ्यांचा भविष्य बरबाद करणारा शिक्षा चोर असून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी अनुसूचित जाती विभाग माजी जिल्हाध्यक्ष पवन आगदारी यांनी केली. आपल्या अध्यक्षीय भाषणात राजुरेड्डी यांनी  भ्रष्टाचारी शिक्षक बोढे याला वाचविणाऱ्या  ग्रामीण जिल्हाध्यक्ष तसेच पालकमंत्री यांचा खरपूस समाचार घेत

पालकमंत्री यांच्या घरीच ठिय्या आंदोलन तसेच घंटानाद करण्याचा इशारा दिला.

 

याप्रसंगी काँग्रेस नेते सुधाकर बांदूरकर, कामगार नेते सैय्यद अनवर, मुन्ना भाई लोहानी, शामरावजी बोबडे, युवक नेते सुरज कन्नूर, सुधाकर बांदूरकर, अलीम शेख, मोसीम शेख,स्टिवन गुंडेटी, रोशन दंतलवार, नुरुल सिद्दिकी,  अनिरुद्ध आवळे, शेख शमीउद्दीन, विशाल मादर, अनुप भंडारी, विजय माटला, दीपक पेंदोर, ताज अस्लम, अरविंद चहांदे, रोहित डाकूर, पिंटू मंडल, देव भंडारी, शहजाद शेख, अभिषेक सपडी, बालकिशन कुळसंगे, कुमार रुद्रारप, थॉमस अर्नाकोंडा, जुबेर शेख, सुनील पाटील, कपिल गोगला, रंजित राखुंडे, अंकुश सपाटे, सन्नी कुम्मरवार, सौ.संगीता किशोर बोबडे, सौ.पदमा त्रिवेनी, सौ.यास्मिन सैय्यद, दुर्गा पाटील, संध्या मंडल, सौ. मंगला बुरांडे, सरस्वती कोवे व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...