वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
*
घुग्घुस येथील फ्रॉड शिक्षक भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष घुग्घूस शहर अध्यक्ष विवेक बोढे या सहाय्यक शिक्षकाने शिक्षण क्षेत्राला कलंकित केले आहे.चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर संचालित साखरवाही जनता विद्यालयात इयत्ता नववीत इंग्रजी शिकविणाऱ्या बोढे यांनी राजकारणात पूर्ण वेळ देता यावा म्हणून आपल्या ठिकाणी मासिक वेतनावर शिक्षक ठेवून शासनाची व विद्यार्थ्यांची फसवणूक केली. या प्रकारा विरोधात घुग्घुस काँग्रेसच्या वतीने गांधी चौकात बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
पालकांच्या गुप्त तक्रारी नंतर काँग्रेस पक्षाचे नेते व पत्रकार यांनी शाळेला भेट दिली असता सदर नकली शिक्षक शुभम कोयडवार यांनी शाळेतून पळ काढला.या संपूर्ण प्रकरणाची काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, संस्था चालक यांच्याकडे तक्रारी नोंदविल्या तसेच पडोली पोलीस स्टेशनला 25 जानेवारी रोजी तक्रार ही दाखल केली. मात्र पालकमंत्री यांच्या दबावाखाली या फ्राड शिक्षकावर कारवाई झालीच नाही.
भाजप सरकारच्या काळात शिक्षण क्षेत्रात प्रचंड माजलेल्या भ्रष्टाचारा विरोधात गांधी चौक घुग्घूस येथे काँग्रेसच्या वतीनं धरने आंदोलन करम्यात आले. या फ्रॉड शिक्षकावर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली.यावेळी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, माजी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, काँग्रेस नेते किशोर बोबडे, सुधाकर बांदूरकर,युवा नेते सुरज कन्नूर,शामरावजी बोबडे,अलीम शेख,मोसीम शेख,रोशन दंतालवरनुरुल सिद्दीकी,,विजय माटला,विशाल मादर,अनुप भंडारी, शहजाद शेख,दीपक पेंदोर,देव भंडारी,शेख शमीउद्दीन, पिंटू मंडल, अभिषेक सपडी, सुरज बहुराशी,जुबेर शेख,संजय कोवे,बालकिशन कुळसंगे,ताज अस्लम,कुमार रुद्रातप,थॉमस अर्नाकोंडा,सुनील पाटील,अजय डांगोरे,सौ.संगिता बोबडे,सौ.पदमा त्रिवेणी,संध्या मंडल,सौ.यास्मिन सैय्यद,दुर्गा पाटील,सौ. मंगला बुरांडे,सरस्वती कोवे, व मोठ्या संख्येने उपस्थित होते
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...