Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्त...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्त महिलांची भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्यासोबत बैठक

अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्त महिलांची भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्यासोबत बैठक

 

 

घुग्घुस येथील अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्त महिलांची शनिवार ११ फेब्रुवारीला घटनास्थळाच्या ठिकाणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्यासोबत बैठक पार पडली.

याप्रसंगी बैठकी दरम्यान शासकीय घरपट्टे देऊन घर बांधून देण्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच सोमवार, १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चंद्रपूर येथील नियोजन भावनात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत शासकीय घरपट्टे देऊन घर बांधून देण्यासाठी अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्त महिलांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी यावेळी दिली. त्यामुळे अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्त महिलांनी आम्ही भाजपा पाठीशी उभे राहू असा निर्धार व्यक्त केला.

 

घुग्घुस येथे अमराई वार्डात मागील वर्षी २६ ऑगस्ट रोजी भुस्खलन होऊन गजानन मडावी यांचे घर जमिनीत गेले होते. त्यामुळे येथील १६० कुटुंबियांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून इतरत्र हलविण्यात आले होते.

येथील अमराई वार्ड धोकादायक स्थितीत असल्याने या वस्तीचे पुनर्वसन करण्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांच्या उपस्थितीत यावर निर्णय घेण्यासाठी तत्कालिन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती.

बैठकीत आमदार प्रतिभा धानोरकर, वेकोलिचे महाप्रबंधक आभासचंद्र सिंग, घुग्घुस काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष राजू रेड्डी, काँग्रेसचे रोशन पचारे, पवन आगदारी, सय्यद अनवर, अलीम शेख, रोशन दंतलवार उपस्थित होते.

बैठकीत सहा महिन्यांत शासकीय घरपट्टे देऊन घर बांधून दिले जाईल तोपर्यंत नागरिकांना घरभाडे देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला होता. परंतु घरपट्टे व घरे बांधून दिली नाही.

 

भुस्खलनग्रस्त अमराई वार्डातील संतप्त महिलांनी घटनास्थळाच्या रस्त्यावर बसून मागील वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात ठिय्या मांडला व  काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची मागणी रेटून धरली होती.

 

काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेले आश्वासन हवेतच विरल्याने भुस्खलनग्रस्त अमराई वार्डातील महिलांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची भेट घेतली व  समस्या सोडविण्यासाठी चर्चा केली.

यावेळी माजी सरपंच संतोष नुने, गणेश उईके, पवन नागपुरे व वार्डवासीय उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...