Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / अवैध जड वाहतुकी विरोधात...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

अवैध जड वाहतुकी विरोधात आमदार सुभाष धोटे आक्रमक. शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे चक्काजाम आंदोलन.

अवैध जड वाहतुकी विरोधात आमदार सुभाष धोटे आक्रमक.    शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे चक्काजाम आंदोलन.

अवैध जड वाहतुकी विरोधात आमदार सुभाष धोटे आक्रमक.

 

शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे चक्काजाम आंदोलन.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 7498975136

 

चंद्रपूर/राजुरा :-- वेकोली बल्लारपूर क्षेत्रा अंतर्गत सास्ती - राजुरा आणि सास्ती - बल्लारपूर मार्गावर राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध्य पद्धतीने कोळसाची जडवाहतूक करणाऱ्या ट्रकांना अडवून लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आक्रमक पवित्रा घेत चक्काजाम आंदोलन केले. स्वतः आमदार धोटे यांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना, पोलीस निरीक्षक राजुरा यांना संपर्क साधून वाहतूक पोलीसांना घटनास्थळी बोलावून कोळसाच्या १५ ओव्हरलोड ट्रक वरती ताबडतोब कार्यवाही करायला लावले व याव्यतिरिक्त अन्य सर्व ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.  

          या प्रसंगी उपस्थित पत्रकार व नागरीकांसमोर आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की सास्ती ते राजुरा रस्त्यासाठी राज्य शासनाकडून ५ कोटी रुपये मंजूर केले होते. काही दिवसांपूर्वी कामाला सुरुवात झाली परंतु क्षमतेपेक्षा जास्त जडवाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे. त्यामुळे ठेकेदार सुद्धा हा रस्ता तयार करतांना गोंधळलेल्या अवस्थेत होते. मंजूर निधी पैकी बराच निधी खड्डे बुजविण्यात खर्च आले. कामाला विलंब होत झाला. वाढिव निधी मंजूर करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागले. अशा परिस्थितीत अतिरिक्त मागणी करून पुन्हा निधी मंजूर केला. आता पुन्हा रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांकडून दिवसाढवळ्या राजरोसपणे अवैध पद्धतीने क्षमतेपेक्षा जास्त कोळशाची वाहतूक होत असल्यामुळे हा रस्ता टिकेल कसा हा प्रश्न उपस्थित केला. यापुढे अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक कोळसा वाहतूक खपवून घेतली जाणार नाही. असेच चित्र सुरू राहील्यास येथील जडवातूक कायमची बंद करण्यासाठी आक्रमक आंदोलन करण्यात येईल. तसेच वेकोलीने कोळसा वाहतूकीसाठी सामान्य नागरिकांच्या वापरासाठी असलेल्या रस्त्यावरून ही वाहतूक न करता पर्यायाई व्यवस्था करावी असे आवाहन केले.

      ते पुढे म्हणाले की, अनेकदा या मार्गावरून ओव्हरलोड वाहतुकीमुळे कोळसा पडून अपघात होणे, धुळ प्रदूषणात वाढ होणे, रस्ते पूर्णपणे खराब होणे अशा अनेक घटना घडून येतात ज्याला कायमस्वरूपी आडा बसणे आवश्यक आहे. वेकोली कामगार व स्थानिक नागरिक यांची वारंवार मागणी आहे की वेकोली प्रशासनाने सुद्धा अवैध जड वाहतुकीला पायबंध घातला पाहिजे. वजन करणारे कर्मचारी तसेच विभागाचे अधिकारी यांना तंबी देऊन कडक कारवाई करण्यात यावी अशा सूचना केल्या.

       या प्रसंगी उप प्रादेशिक परिवहन निरिक्षक नरेंद्रकुमार उमाडे, विशाल कसंबे, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, वाहतूक पोलीस, यासह काँग्रेसच्या विविध विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सास्ती, धोपटाळा, रामपूर परिसरातील शेकडो स्थानिक नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...