वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर:- चंद्रपूर तालुक्यातील शेणगाव येथे गेल्या दोन दशकापासून विविध कार्यक्रमाची रेलचेल नियमित असते, परंतु गेल्या दोन वर्षात या कार्यक्रमाला कोरोना काळात स्थगिती आल्यानंतर अजून पुन्हा नव्याने शेणगाव येथे विविध कार्यक्रमाची रेलचेल या फेब्रुवारी महिन्यात सुरु झाली आहे.
नुकताच जानेवारी महिन्यात ग्रामपंचायत आयोजित जिजाऊ सावित्री दशरात्रोत्सव निमित्त *ग्राम महोत्सव* संपन्न झाला आणी हा फेब्रुवारी महिन्यात पूर्ण कार्यक्रमाने हाउसफुल झालेला आहे.
नुकताच दि. 4 व 5 फेब्रुवारी ला श्री गुरुदेव सेवा मंडळ आयोजित *वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव* संपन्न झाला.
त्यानंतर दिनांक 12, 13 व् 14 फेब्रुवारी ला जय हनुमान क्रीडा मंडळ, शेनगाव आयोजिय *भव्य पुरुषांचे कबड्डी सामन्याचे* आयोजन करण्यात आले आहे.
त्यानंतर दरवर्षी संभाजी ब्रिगेड आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त *छत्रपती महोत्सव* दिनांक 18 व 19 फेब्रुवारी ला आयोजन करण्यात आली आहे. त्यामध्ये रक्तदान शिबिर, मॅरेथान स्पर्धा, सत्यपाल महाराज यांचे शिष्य नयनपाल महाराज यांची *क्रांतिवाणी* आणि भव्य मिरवणुकीने छत्रपती महोत्सवाचा समारोप होणार आहे.
त्यानंतर लगेच दि. 21 फेब्रुवारी ला शेणगावच्या राजा गणेश मंडळ आयोजित *लोक काय म्हणतील..?* हे बंद शामियानातील भव्य तीन अंकी नाटक संपन्न होणार आहेत. लगेच समस्त शेणगाव ग्रामवासी आयोजित शेतकऱ्यांचा उत्सवाची स्पर्धा म्हणजे *बैलजोडीचा जंगी इनामि शंकर पट* दिनांक 23, 24 आणि 25 फेब्रुवारीला संपन्न होणार आहेत.
अश्या विविध कार्यक्रम आणी स्पर्धाने संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात शेणगाव येथे विविध कार्यक्रमाची रेलचेल असून फेब्रुवारी महिना हाउसफुल आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...