Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / आमदार सुभाष धोटेंनी...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

आमदार सुभाष धोटेंनी घेतला गोंडपिपरी तालुक्यातील पाणी टंचाईचा आढावा.

आमदार सुभाष धोटेंनी घेतला गोंडपिपरी तालुक्यातील पाणी टंचाईचा आढावा.

आमदार सुभाष धोटेंनी घेतला गोंडपिपरी तालुक्यातील पाणी टंचाईचा आढावा.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

चंद्रपूर/गोंडपिपरी:- तालुक्यांमध्ये उन्हाळ्यात ज्या भागात पाणी टंचाई निर्माण होते त्यासोबतच सध्या परिस्थितीत कुठल्याही तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना पाणी टंचाई भेडसावत असेल तर ती दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती गोंडपीपरी च्या सभागृहात पाणी टंचाई नियोजन संदर्भात आढावा बैठक पार पडली.

      या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित सरपंच, ग्रामसेवक यांच्या अडचणी ऐकून घेतल्यानंतर संबंधित विभागांना सुचना केल्या की, शुद्ध पिण्याचे पाणी आवश्यकतेनुसार मिळणे हे नागरिकांचा हक्क आहे. तेव्हा जेथे कुठे पाणी टंचाई निर्माण होते तेथे प्रत्यक्ष पाहणी करून वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा करून या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. आवश्यकतेनुसार नवीन हातपंप बसविणे, विहिरीचे गाढ काढणे, खासगी बोर, विहीर अधिग्रहण करणे, टँकरने पाणीपुरवठा करणे, मंजूर कामे त्वरित पूर्ण करणे, वाढीव पाईपलाईन करणे, मीटर जोडणी करणे यासह अन्य आवश्यक बाबींची पूर्तता करणे याकडे स्वतः लक्ष देऊन समस्या दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

       या प्रसंगी तहसीलदार के. डी. मेश्राम, नायब तहसिलदार अविनाश शेंबटवाड, गट विकास अधिकारी शालिक माहूलीकर, पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय कार्यकारी अभियंता  उमकेश दराडे, कनिष्ठ अभियंता विलास भंडारी, सहाय्यक भूजल वैज्ञानिक डॉ. यो. अ. दुबे, उपविभागीय अभियंता महावितरण अरविंद कतकर उपविभागीय बांधकाम अभियंता एन डी. वैद्य, जि. प. उपअभियंता व्हा.एन. खापने यासह गोंडपिपरी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

गोंडपिपरीतील बातम्या

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद*

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला*

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...