Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / प्रत्यक्ष पाहणी करून...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

प्रत्यक्ष पाहणी करून पाणी टंचाई दूर करा. आमदार सुभाष धोटेंच्या पाणीटंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना.

प्रत्यक्ष पाहणी करून पाणी टंचाई दूर करा.    आमदार सुभाष धोटेंच्या पाणीटंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना.

प्रत्यक्ष पाहणी करून पाणी टंचाई दूर करा.

 

आमदार सुभाष धोटेंच्या पाणीटंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

चंद्रपूर/राजुरा:-_ राजुरा तालुक्यामध्ये उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाई चे निराकरण करणे व प्रभावी उपाययोजना करण्यासाठी बी. आर. सी. हॉल, पंचायत समिती राजुराच्या सभागृहात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई नियोजन आढावा बैठक पार पडली.

         आमदार सुभाष धोटे यांनी तालुक्यातील उपस्थित सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या अडचणी, सुचना ऐकून घेतल्यानंतर संबंधित विभागांना सुचाना केल्या की, ज्या ज्या गावांमध्ये पाणी टंचाई आहे, किंवा अन्य काही तांत्रिक अडचणींमुळे पाणी टंचाई आहे तेथे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून वरिष्ठ पातळीवर, शासनाकडे, पाठपुरावा करून पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. राजुरा तालुक्यातील नोकरी खुर्द, चार्ली येथे अधिकाऱ्यास आपण प्रत्यक्ष भेट देऊन येथील पाणी पुरवठा योजनेची वस्तूस्थिती, अडचणी तपासून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. तसेच पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासून  नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यावर भर द्यावा. पिण्याच्या पाण्यात फ्लोराईड व या सारख्या अपायकारक घटकांचे प्रमाण जास्त असेल तर ते कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात असे सांगितले. आवश्यकतेनुसार नवीन हातपंप बसविने, हातपंपाची दुरूस्ती करणे, विहिरीचे गाढ काढणे, खासगी बोर, विहीर अधिग्रहण करणे, आवश्यक त्याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करणे, जेथे जुन्या पाईपलाईन वारंवार खराब होऊन नागरिकांना पाणी टंचाई भेडसावत आहे त्या समस्येचे निराकरण करणे यासंदर्भात सूचना अधिकाऱ्यांना दिल्या,

 या प्रसंगी तहसीलदार हरिष गाडे, गट विकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे, पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता एच. बी. चव्हाण, सहाय्यक भूजल वैज्ञानिक ग्रामीण पाणीपुरवठा विभाग डॉ. यो. अ. दुबे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय कार्यकारी अभियंता बडकू, सहाय्यक गट विकास अधिकारी धर्मपाल क-हाडे, कनिष्ठ अभियंता सतिश खोब्रागडे यासह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...