रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
चंद्रपूर/कोरपना: उन्हाळा सुरू होण्यास काही मोजकेच दिवस असल्याने व क्षेत्रात अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होत असल्याचे संदर्भ लक्षात घेता आमदार सुभाष धोटे यांनी क्षेत्रात तालुका निहाय पाणी टंचाई निवारणार्थ आढावा बैठका घेऊन प्राथमिक उपाययोजना करण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देत आहेत. यासंदर्भात आज लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती कोरपना येथील सभागृहात पाणी टंचाई नियोजन बैठक पार पडली. कोरपना तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते. यात तालुक्यातील ज्या गावात उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होते त्यासंदर्भात उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. महामार्गाच्या कामामुळे पाईप लाईनचे नुकसान झाले किंवा पाणी पुरवठा खंडीत झाले असल्यास सदर कंपनीला नोटीस देणे आणि आवश्यकता पडल्यास FIR नोंदविणे याबाबत सांगितले. तसेच पाणीपुरवठा योजनेचे नवीन हातपंप बसविने, विहिरीचे गाढ काढणे, खासगी बोर व विहीर अधिग्रहण करणे, काही गावांना आवश्यक त्याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करणे यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच सुरू असलेल्या नळ योजना दुरुस्ती करणे, स्वतंत्र पाणीपुरवठा योजना जलजीवन योजनेअंतर्गत मंजूर असली कामे त्वरित पूर्ण करणे, वाढीव पाईपलानचे प्रस्ताव सादर करणे, मीटर जोडणी त्वरीत करणे इत्यादी बाबी प्रत्यक्ष लक्ष देऊन पुर्ण कराव्यात असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव बावणे, नायब तहसीलदार चीडे, गट विकास अधिकारी विजय पेंदाम, उपविभागीय अभियंता पाणी पुरवठा चव्हाण, सहाय्यक भू वैज्ञानिक ग्रामीण पाणीपुरवठा विभाग डॉ. मो. अ. दुबे, उपविभागीय कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी इंदुरकर, सहायक गट विकास अधिकारी गजानन मुंडकर, कनिष्ठ अभियंता खोब्रागडे, माजी सभापती सुग्रीव गोतावळे, माजी जि. प. सदस्य सिताराम कोडापे यासह कोरपना तालुक्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...