Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *आजार मुक्त गावांसाठी...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*आजार मुक्त गावांसाठी पाचगाव ग्राम पंचायत कटिबध्द*

*आजार मुक्त गावांसाठी पाचगाव ग्राम पंचायत कटिबध्द*

*आजार मुक्त गावांसाठी पाचगाव ग्राम पंचायत कटिबध्द*

 

*पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी घेतली शपथ !  

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

 

चंद्रपूर/राजुरा:     क्षयरोग व कॅन्सर सारख्या जिवघेण्या आजारांपासून मुक्ती मिळावी, गावात स्वच्छता ठेवून नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि असे आजार पसरू नये यासाठी घ्यावयाची काळजी.शासनाच्या आरोग्य विषयक योजना गावात राबवून नियमांचे पालन करण्यास पाचगाव ग्राम पंचायत प्रशासनाने पुढाकार घेत लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले.ग्रा.प.पदाधिकाऱ्यासह शालेय विद्यार्थी,पालक, शिक्षकवृंद व ग्रामस्थांनी शपथ घेत आजाराला दुर ठेवण्याचा संदेश दिला.

      क्षयरोग -कर्करोग हा वृद्धावस्थेत होतो हा समज खोटा ठरत असुन, तरूणांमध्ये आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.एका सर्व्हे क्षणातील निष्कर्षानुसार युवकांच्या जिवन शैलीत होणारे बदल,अतिमध्यप्राशन, धुम्रपान, व्यसनाधीनता, अस्वच्छता, वाईट संगत असल्याचे पुढे आले.अशा भयानक आजारांपासून दूर राहायचे असल्यास प्रदुषण मुक्त राहावे लागेल, त्यासाठी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज आहे.

    क्षयरोगा सारख्या संसर्गजन्य रोगांपासून मुक्ती मिळवायची असल्यास स्वच्छता बाळगणे,हातधुणे,शौचालयाचा नियमित वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे,खोकतांना रूमाला वापर करणे, शिकतांना काळजी घेणे,आजाराची लक्षणे दिसताच वेळीच उपचार व औषौधोपचार घेणे, आजारी रूग्णाला मदत करणे व उपचारासाठी प्रोत्साहन दिल्यास निश्चितच गाव निरोगी राहण्यास मदत होईल.

      पाचगाव ग्राम पंचायतीच्या पुढाकाराने आजारांपासून दूर राहण्याचा संदेश देणारी शपथ जि.प.उच्च प्राथ.शाळेच्या मंचावरून देण्यांत आली.शासनाच्या शपथ संदेशाचे वाचन शिक्षक मनोहर बोबडे यांनी केले. शपथ घेतांना उपसरपंच सौ.उज्वला अकबरशाह आत्राम, पाचगाव ग्राम पंचायत सदस्य बापुरावजी मडावी,मनोज कुरवटकर,सौ.कल्पना म. काकडे,सौ.शुभांगी उ. गोनेलवार,सौ.पार्वता वि. तलांडे,ग्रामविकास अधिकारी गणेश राठोड, मुख्याध्यापक अमर पाझारे,माजी.पं.स.सदस्य सौ.सुनंदा दे.डोंगे, प्रतिष्ठित नागरिक शंकरराव गोनेलवार,पो.पा.शंकर खामनकर,शाळा समिती अध्यक्ष सत्यपाल चापले व सदस्य,ग्रा.प. कर्मचारी लक्ष्मण गेडाम,रूपेश गेडेकर,यादव पिदुरकर,रामा आळे,शाळेचे शिक्षक वृंद, आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ शपथ घेतांना उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...