शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :कोरपणा
आज साखरवाही शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड यांचे मार्फत श्री गुरुदेव जिनिंग प्रेसिंग तालुका कोरपना येथे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने थेट कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला उदघाटक म्हणून श्री देवरावजी भोंगळे जिल्हा अध्यक्ष भाजपा तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा कृषी अधिकारी श्री यांचे उपस्थितीत करण्यात आला यावेळी शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक नामदेवजी डाहुले यांनी या कंपनीच्या माध्यमातून तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ना दलाली ना हमाली या आधारावर सदरची कंपनी शेतकऱ्यांचा माल थेट खरेदी करेल व त्यांना त्यांच्या खात्यात थेट मोबदला प्रदान केला जाईल अशा पद्धतीची योजना कंपनी राबवत असल्याचे सांगितलं.
तसेच सदरची शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून तालुक्यात "एक गाव-एक वाण" ही योजना राबवण्याची ही संकल्पना त्यांनी उपस्थितांपुढे मांडली. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांना पडत्या बाजार- भावातही माल विकावा लागतो ही खंत जानक बाब असल्याचे नमूद करत शेतकऱ्यांवर अशी परिस्थिती येऊ नये म्हणून शेतकऱ्यांचा माल शासकीय गोदामामध्ये ठेवून त्यांना कमी व्याजदरात 70 टक्के पर्यंत मोबदला उपलब्ध करून देण्याचे संकल्पना असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांपुढे मांडले.कंपनी च्या संचालकानी शेतकऱ्यांना या सर्व योजनांचा लाभ उचलण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी उपस्थित जिल्हा कृषी अधिकारी भऱ्हाटे साहेब तसेच भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष मा.देवराव दादा भोंगळे यांनी शेतकऱ्यांना सदर कंपनी मार्फत भेटत असलेल्या बाबींचा फायदा स्वतःसाठी करून घेण्याचे सूचना केली तसेच सदर शेतकरी उत्पादक कंपनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...