Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *रिपब्लिकन क्रांती...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*रिपब्लिकन क्रांती परिषदेकरीता जनजागृती मोहिमेला सुरुवात*

*रिपब्लिकन क्रांती परिषदेकरीता जनजागृती मोहिमेला सुरुवात*

*रिपब्लिकन क्रांती परिषदेकरीता जनजागृती मोहिमेला सुरुवात*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर प्रतिनिधी

7498975136

 

रिपब्लिकन क्रांती परिषदेकरीता घेण्यात येत असलेल्या जागृती मोहीमेला ऍड. सिद्धार्थ गायकवाड यांच्या उपस्थितीत वकिल, डॉक्टर, शिक्षक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते मंडळींच्या सदिच्छा भेटीने सुरुवात.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष सध्या ज्यांच्या हातात आहे त्यांना हा पक्ष सर्व सामान्यांना खुला केला तर बाबासाहेबांचे अनुयायी कार्यकर्ते लोकशाही मार्गाने कुठे आपलीच हकालपट्टी करतील की काय ? या अनामिक भितीपोटी हा पक्ष वाढीसाठी काहीच हालचाल करीत नसल्याने व पक्षाची सत्ता सुत्रे हाती असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या घोर उदासीनतेमुळे साऱ्या जगाला आदर्शवत बाबासाहेबांचा पक्ष आज मोडकळीस आलेल्या परिस्थितीत दिसत आहे. तसेच अन्य पक्ष संघटनेचे कार्यकर्ते आमचाच पक्ष बाबासाहेबांच्या विचारधारेनुसार वाटचाल करीत आहे, अशी भावनिक ब्लाकमेल करीत असल्याने बाबासाहेबांच्या अधिकृत रिपब्लिकन पक्षाची कार्यकर्त्यांविना दयनीय अवस्था निर्माण झाली आहे.

अशा निराशेच्या गर्तेतून मोडकळीस येत असलेल्या पक्षाला बाहेर पडण्यासाठी बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रचारकांनी १६ एप्रिल २०२३ ला अमरावती येथे रिपब्लिकन क्रांती परिषदे करीता संयुक्त राष्ट्रसंघात प्रथम भाषण देणारे, मॉकडोर सामा. संस्थेचे अध्यक्ष व रिपब्लिकन चळवळीचे भाष्यकार मा. अशोक भारती, दिल्ली, यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्घाटक आदरणीय भंते ज्ञानज्योती परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे

या परिषदेकरीता जागृतीचा एक भाग म्हणून  अमरावती शहरातून रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांना रिपब्लिकन पक्षाचे संविधान आणि बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात सामील होण्यासाठी भारतीय जनतेला आवाहन करणारे खुले पत्र पुस्तिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रचारक अशोककुमार उमरे आणि देवानंद लांजेवार कडून विनामूल्य भेट देण्यात येत आहे. सदर जनजागरण मोहीमेला वकिल, डॉक्टर, शिक्षक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते मंडळींसह सर्व सामान्य रिपब्लिकन जनतेचा उदंड सकारात्मक प्रतिसाद पहावयास मिळत आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...