वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस शहरातील दहा बगिच्यांची व सार्वजनिक शौचालयाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी न.प. चे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांना दिलेल्या निवेदनातून केली होती.
याची दखल घेत नगर परिषदेतर्फे दहा बगिच्यांची दुरुस्ती सुरु करण्यात आली आहे.
त्यामुळे भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मागणीला यश आले आहे. घुग्घुस परिसरातील अनेक वार्डात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून सुंदर दहा बगिच्यांची निर्मिती करण्यात आली होती. या बगिच्यांच्या निर्मितीला तीन वर्षाचा लोटत आहे. त्याठिकाणी बसविण्यात आलेले लोखंडी जीमचे साहित्य मोडकळीस आले आहे.
बगिच्यामध्ये दररोज सकाळी लहान मुले खेळण्यासाठी तसेच जेष्ठ नागरिक आणि महिला व्यायाम करण्यासाठी जातात. परंतु तेथील लोखंडी साहित्य मोडकळीस आल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असे ही समस्या लक्षात घेत भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी निवेदनातून मागणी केली होती. तसेच नगर परिषदेतर्फे सार्वजनिक शौचालयाच्या जवळील कचरा सफाई करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...