Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / सिद्धार्थ पथाडे यांची...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

सिद्धार्थ पथाडे यांची आर पी आय आठवले गटाच्या विदर्भ उपाध्यक्षपदी नियुक्ती : मान्यवरांनी केला सत्कार.

सिद्धार्थ पथाडे यांची आर पी आय आठवले गटाच्या विदर्भ उपाध्यक्षपदी नियुक्ती : मान्यवरांनी केला सत्कार.

सिद्धार्थ पथाडे यांची आर पी आय आठवले गटाच्या विदर्भ उपाध्यक्षपदी नियुक्ती : मान्यवरांनी केला सत्कार.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

चंद्रपूर/राजुरा :-- अनेक अडचणी असतानाही स्वतःशी प्रामाणिक राहणे, वैचारिक संपत्ती असूनही साधे राहणे, राग असूनही शांत राहणे, अधिकार असूनही नम्र राहणे यालाच आयुष्याचं व्यवस्थापन म्हणतात. हे जो साध्य करतो तो यशाच्या शिखरावर पोहोचतो कठीण प्रसंगाला तोंड देत स्वतःची यशोगाथा सिद्ध करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आंबेडकरी चळवळीचे बिनीचे शिलेदार व रिपाई आठवले गट चे नेते आयुष्यमान सिद्धार्थ आस्तिक पथाडे संकट आणि संघर्ष माणसाला बलवान बनवतात या विचाराला सार्थक ठरवत सिद्धार्थ पथाडे यांनी आयुष्याला सुरुवात केली. एका खेड्यातील सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन कुठलीही राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी नसताना ही स्वबळावर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रासोबतच सहकार चळवळीच्या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले. ज्या समुदायाला शिक्षणाची बंदी होती त्या समाजातील वंचित पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आदिवासी व दुर्गम भागात शाळा सुरू करून शिक्षणाची दारे उघडी केली. अशा कर्तुत्वान व्यक्तीचा सत्कार करून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देताना भोईढिवर समाज संघाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष तथा सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी कृष्णाजी भोयर, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ विभागीय महासचिव तथा कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई, गोंडवाना चळवळीचे अभ्यासक तथा पाचगाव ग्रामपंचायतचे सदस्य बापूराव मडावी, रिपाई चे कार्यकर्ते विकास आलोने, राजू चेन्ने, महेंद्र साखरकर यांनी सिद्धार्थ पथाडे यांचे घरी जाऊन भेट घेतली व त्यांची विदर्भ उपाध्यक्ष आर पी आय आठवले गट पदी नियुक्ती झाली. त्यांच्या या संघर्षमय यशाच्या भरारी बद्दल शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...