Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *भीमा तुझ्या मताचे जर...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक.......*

*भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक.......*

*भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक.......*

 

*आपणाला संसदीय लोकशाहीचे पुरेसे, समर्पक ज्ञान असते तर बाबासाहेबांनी मोठ्या परिश्रमाने दिलेली लोकशाही प्राणप्रिय समजणाऱ्या बाबासाहेबांच्या निष्ठावान, स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी मागील बावन वर्षांपासून एकाच घरात अवैधरित्या ताब्यात असलेल्या पक्षाला आणि चुकीच्या नेत्यांना, त्यांच्या स्वार्थी धेय्य धोरणांवर नुसत्या टिका करत बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षापासून दूर राहिले नसतो. पक्षांतर्गत लोकशाही संविधानानुसार बहुमताने आपला योग्य नेता निर्वाचित व वाटचाल करीत बाबासाहेबांनी मोठ्या परिश्रमाने निर्माण केलेली लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान दिले असते. जसे- भारत देश नावाच्या संघटनेला खंडित करून नाही तर शत्रू पक्षापासून आणि चुकीच्या प्रमुखांना वठणीवर आणून किंवा योग्य यंत्रणेचा वापर करून बहुमताने योग्य प्रमुखांची निवड करून संविधानानुसार संरक्षण आणि संवर्धन करायचे आहे.*

 

*साऱ्या जगाला आदर्शवत लोकशाही संविधान देणाऱ्या बाबासाहेबांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा कारभार संविधानाची हेटाळणी करीत संविधानाचा देखावा निर्माण करून हुकूमशाह, एकाधिकारशाह वाटचाल करीत आहे. अशा अंसैविधानीक नीतीला वेळीच रोखण्यासाठी आणि पक्षाच्या घटनेनुसार वाटचाल करण्यासाठी बाबासाहेबांच्या आदर्श आणि प्रेरणादायी पक्षाचे संविधान आणि प्रकटपत्र बाबासाहेबांच्या अनुयायी कार्यकर्त्यांपर्यंत पोहचविण्याचा ही पुस्तिका छोटासा प्रयत्न.*

 

*रिपब्लिकन प्रतिक्रांतीचे फार मोठे वादळ घोंघावत आहे. आतातरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सभासद होऊन एक व्हा आणि पक्षाच्या घटनेनुसार आपला नेता निर्वाचित करून केवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भक्कम एकसंघ संघटनशक्ती निर्माण करण्यासाठी सज्ज व्हा ! कारण आता कुठे  बाबासाहेबांच्या वैचारिक रिपब्लिकन चळवळीच्या क्रांतीची पालेमुळे रूजण्यास सुरूवात होत असताना आणखी एकाधिकारशाही, घराणेशाही आणि हुकूमशाहीवादी बाबासाहेबांच्या अनुयायांना भुरळ घालणाऱ्या मायावी संकल्पनेच्या माध्यमातून सत्तासुंदरीचा लॉलीपॉप दाखवत  बाबासाहेबांची लोकशाहीवादी रिपब्लिकन विचारधारा नष्टप्राय करू पाहणारी तिसरी रिपब्लिकन प्रतिक्रांती गोड पावलांनी शिरली आहे. वर्णवर्चस्ववादी विरोधकांचा सामना करण्याऐवजी आता रिपब्लिकन्सला आणखी भक्तांच्या फार मोठ्या भक्कम मांदियाळीचा अंतर्गत संघर्षाचा सामना करावा लागणार आहे.

चला तर बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संविधानीक माहिती प्राप्त करून घेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात सामील होण्यासाठी बाबासाहेबांनी आवाहन केलेले प्रकटपत्र यांच्या प्रसार आणि प्रचारार्थ हातभार लावून आजवरच्या आपल्या कार्याला आणखी एका कृती कार्यक्रमाची जोड देऊन बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष आपला, सर्व सामान्य भारतीयांचा होण्यासाठी यथाशक्ती हातभार लावू या. बाबासाहेबांनी खुल्या पत्रातून केलेल्या आवाहन, विनंतीला किती दिवस धुडकावून लावत बाबासाहेबांच्या विचार संघटनेला मोडकळीस आणणाऱ्या तंबूत सामील होत राहणार आहोत? भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते असे नुसते बोंबलत राहून नाही तर पक्षात सामील होऊन संविधानानुसार वाटचाल केल्यास फायद्याचे ठरणार आहे. मी तर रिपब्लिकन क्रांती लॉंगमार्चने बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात सामील करण्याची प्रक्रिया सुरूवात केली आहे. आपण-*

 

- अशोककुमार उमरे, गडचांदूर- 8698842402

देवानंद लांजेवार, अमरावती- 9130453961

प्रचारक,

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

संस्थापक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...