खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
*गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था जिवती यांनी दिले गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना निवेदन*
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
चंद्रपूर :- भाषा ही प्रत्येक समूहाचे अस्तित्व व सांस्कृतिक वारसा निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम आहे. विदर्भासह आजूबाजूच्या राज्यांमध्ये गोंडीयन समुदाय मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. त्यांची मूळ व दैनंदिन भाषा ही गोंडी आहे. त्या भाषेचे संवर्धन व्हावे आणि आदिवासी समूहाचा सांस्कृतिक वारसा टिकून राहावा यासाठी गोंडी भाषा शब्दकोषाची निर्मिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी गोंडवाना विद्यापीठाने पुढाकार घ्यावा या आशयाचे निवेदन दि. 25 जानेवारी ला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना देण्यात आले.
गोंडी भाषेचे संवर्धन व्हावे व ती टिकावी यासाठी डॉ. मोतीरावन कंगाली यांनी देशपातळीवर गोंडी भाषा मानकिकरण कार्यशाळेचा उपक्रम राबविला व तीन हजार शब्दांचा गोंडी भाषेचा शब्दकोष तयार केला. या शब्दकोषाचे प्रकाशन कर्नाटक राज्यातील कन्नड विद्यापीठ हम्पी यांनी केले.
मध्य भारतातील चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडारा नागपूर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोंडी भाषा बोलल्या जाते. गोंडी भाषेचे शब्द विद्यार्थी मनावर बिंबवण्यासाठी गोंडी भाषा शब्दकोष तयार होणे गरजेचे आहे. त्यासाठी जागतिक भाषा तज्ञ तथा गोंडी भाषा तज्ज्ञांची मदत घेऊन गोंडवाना विद्यापीठाने गोंडी भाषा शब्दकोष तयार करून प्रकाशित करावा अशी मागणी गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था जिवती यांच्या शिष्टमंडळाने केली.
शिष्टमंडळाने सध्या गोंडवाना विद्यापीठाने वनाधिकार व पेसा कायदे थेट आदिवासी कार्यकर्त्यांना शिकवणारा अभ्यासक्रम सुरू केला त्याबद्दल गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे अभिनंदन करून आभार मानले.
या शिष्टमंडळात गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था जिवतीचे अध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्थेचे सचिव बापूरावजी मडावी, गोंडी भाषा व संस्कृतीचे अभ्यासक, साहित्यिक नंदकिशोर नैताम, युवा सामाजिक कार्यकर्ते नितीन बावणे, संकेत कुळमेथे, गोविंद वाघमारे उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...