Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *लोकशाही आणि संविधान...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*लोकशाही आणि संविधान रक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देणे आवश्यक : आमदार सुभाष धोटे* *इन्फंट कॉन्व्हेंट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात : माजी नगराध्यक्ष अरुण धोटेंच्या हस्ते ध्वजारोहण.*

*लोकशाही आणि संविधान रक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देणे आवश्यक : आमदार सुभाष धोटे*    *इन्फंट कॉन्व्हेंट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात : माजी नगराध्यक्ष अरुण धोटेंच्या हस्ते ध्वजारोहण.*

*लोकशाही आणि संविधान रक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देणे आवश्यक : आमदार सुभाष धोटे*

 

*इन्फंट कॉन्व्हेंट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात : माजी नगराध्यक्ष अरुण धोटेंच्या हस्ते ध्वजारोहण.*

 

  ✍️दिनेश झाडे

 चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

   7498975136

 

चंद्रपूर/राजुरा :- भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट् जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल, कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग, बी. एस्सी. नर्सिंग, रामचंद्रराव धोटे महाविद्यालय राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ठिक ७.४५ वाजता संस्थेचे सचिव तथा माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर इन्फंट कॉन्व्हेंट च्या विद्यार्थ्यांनी पथसंचालन सादर केले. या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, लोकप्रिय आमदार सुभाष धोटे म्हणाले की, एका प्रदीर्घ संघर्षांनंतर आणि बलिदानाने भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीने जगातील सर्वात मोठे व सक्षम असे संविधान देशासाठी तयार व लागू केले. ज्यामुळे विविधतेने नटलेला भारत एकसंघ राहून एका महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आजपर्यंत बरेच चढ उतार या देशाने पाहिले आहे. या पुढे येणाऱ्या पिढीवर फार मोठी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे शालेय स्तरावर लोकशाही आणि संविधान रक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

         या प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर  गीत, नृत्य, भाषण, कराटे, लेझीम, भुमिका अभिनय अशा विविध कलागुणांचे सादरीकरण केले. तसेच गडचांदूर येथे आयोजित विदर्भ स्तरीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्यांचा व शालेय स्तरावरील विविध स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला.

           या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव तथा माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजित धोटे, कल्याण कॉलेज ऑफ बी. एस्सी नर्सिंग चे प्राचार्य संतोष शिंदे, प्राचार्या पुजा गिते, रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, प्राचार्य समिर पठाण, इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...