आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
अमृत महोत्सव देशाची व्यथा
जिवती:-
तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले भारी पासून अवघे चार किलो मिटर अंतरावर असलेल्या या कमलापुर गावाची हकीकत अगदी मनाला चटका लावून जाणारी आहे.गावातील नागरिक मोतीराम राय सिडाम यांनी सांगितले की गावाला बसून पस्तीस पेक्षा जास्त वर्षे
झाली ? आता गावाची परिस्थिती पाहिली तर अत्यंत गंभीर आहे.गावात लोकसंख्या सत्तर ते अंशी आहे.गावातील शाळा कधीच बंद झाली.गावात ग्राम पंचायत कडून केवळ तीस मीटर काँक्रिट रोड तयार करण्यात आला आहे.त्यामुळे पावसाळ्यात गावात चिखलाचे साम्राज्य असते.गावात सहा महिन्यांत एखादे वेळी ग्राम सेवक येतात तेही तर कधी कधी वर्षभर येत नाही.आम्हला घर पट्टी चे काम पडले की आम्हीच ग्राम पंचायत ला जाऊन घर टॅक्स भरत असतो.आम्ही नाल्यातील पाणी पितो आणि पाणी पट्टी मात्र दरवर्षी घेतली जाते असे लक्ष्मीबाई यांनी सांगितले.पूर आला की नदीत पाण्यासाठी यावे लागते कधी कधी पूर स्थिती गंभीर असताना जीवाची बाजी लावून पाणी भरावे लागते.वरून पाण्याची लाट कधी येईल अन कधी घेऊन जाईल अशी स्थिती झालेली असते.असे पाणी पिऊन आम्ही वर्षभर कोणत्या ना कोणत्या बिमारीशी झुंज असते.गाव बसल्यापासून केवळ एकदा पाण्यासाठी बोअरवेल मारली होती तिला पाणी लागले नाही.त्यानंतर नदीत विहीर खोदली मात्र त्यावरून पुराचे पाणी वाहून जाते आणि ती विहीर जमिनीपासून सात फूट उंच आहे. त्यामूळे तळे उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती निर्माण झाली आहे असे भगवंतराव सलाम यांनी परिस्थिती सांगितली.आदिवासी समाजाकरीता शासनाकडून खूप योजना राबविल्या जातात पण आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पिण्यासाठी योग्य पाणी मिळत नाही तर हे स्वतंत्र कसले असे.मोतीराम राय सिडाम यांनी सांगितले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...