Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / आमदार चषक कबड्डीप्रेमींसाठी...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

आमदार चषक कबड्डीप्रेमींसाठी ठरेल रोमांचक अनुभव???? : आमदार सुभाष धोटे.

आमदार चषक कबड्डीप्रेमींसाठी ठरेल रोमांचक अनुभव???? : आमदार सुभाष धोटे.

????आमदार चषक कबड्डीप्रेमींसाठी ठरेल रोमांचक अनुभव???? : आमदार सुभाष धोटे.

 

   ✍️दिनेश झाडे

  चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 ????7498975136

 

चंद्रपूर/राजुरा :-- कबड्डी हा आपल्या मातीशी नाड जुडलेला खेळ आहे. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात मोठ्या प्रमाणात कबड्डी खेळल्या जाते. राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत या खेळाला लोकमान्यता मिळाली आहे. विदर्भातील नामांकित कबड्डी संघांच्या खेळाडूंच्या चित्त थरारक खेळाचे प्रदर्शन बघता यावे, कबड्डीचे कौशल्य आत्मसात करता यावे या हेतूने राजुरा क्षेत्रातील कबड्डी प्रेमी जनतेसाठी विदर्भस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. कबड्डीप्रेमींसाठी हा आमदार चषक रोमांचक अनुभव ठरणार आहे. त्यामुळे राजुरा येथे दिनांक २०,२१, २२ जानेवारी २०२३ या तीन दिवसांत संपन्न होणाऱ्या या आमदार चषकात क्षेत्रातील समस्त जनतेने उपस्थित राहून रोमांचक कबड्डी सामन्यांचा आश्वाद घ्यावा असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी थेट आमदार चषक कबड्डीचे आयोजन स्थळ महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय राजुरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे. या प्रसंगी सेवा कलस फाउंडेशन राजुरा चे संस्थापक अध्यक्ष अभिजित धोटे, चंद्रपूर जिल्हा कबड्डी महासंघाचे पदाधिकारी दिलीप रामेडवार, सुभाष गौर, कुणाल चहारे, एजाज अहमद, प्रा. प्रफुल्ल शेंडे उपस्थित होते.

       ते पुढे म्हणाले की, या स्पर्धेत पुरुष व महिला गटातून पुलगाव, नागपूर, उमरेड, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती, वर्धा, मोर्शी, बुलढाणा, यवतमाळ, अजनी, सावनेर, भिवापूर, हिंगणघाट, चंद्रपूर सह विदर्भातील ३२ पुरूष तर १६ महिला कबड्डी संघांचा समावेश असणार आहे. या चषकाचे उद्घाटन प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री पुजा सावंत, बंगाल वारियर, दबंग दिल्ली चे प्रो कबड्डी खेळाडू यांच्या उपस्थितीत दिनांक २० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार आहे. तेव्हा सर्वांनी या सोहळ्यात सहभागी होऊन तीन दिवसीय कबड्डी सामन्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

       आमदार सुभाष धोटे यांच्या संकल्पनेतून राजुरा कल्ब राजुरा द्वारा आयोजित या चषकात पुरुष गट आणि महिला गट अशा दोन गटात कबड्डी चे सामने होणार आहेत. पुरुष गटात प्रथम पुरस्कार ७१ हजार रुपये रोख व चषक, स्वर्गीय रामचंद्रराव धोटे माजी आमदार यांच्या स्मृती प्रित्यर्थ आमदार सुभाष धोटे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. द्वितीय पुरस्कार ५१ हजार रुपये रोख व चषक, स्वर्गीय सुधाकरराव देशपांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुनील देशपांडे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. तर महिला गटात प्रथम पुरस्कार ५१ हजार रुपये रोख व चषक, स्वर्गीय प्रभाकरराव मामुलकर माजी आमदार यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रीमती सुमनताई मामुलकर यांच्यातर्फे आणि द्वितीय पुरस्कार ३१ हजार रुपये रोख व चषक, श्रीमती मालतीबाई धोटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. तसेच इतर अनेक वैयक्तिक पुरस्कार देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे बक्षीस वितरण दिनांक २२ जानेवारी रोजी शानदार सोहळ्यात होणार आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...