Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / अखिल भारतीय सरपंच परिषदेचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

अखिल भारतीय सरपंच परिषदेचा पर्यटन अभ्यास दौऱ्याला चंद्रपूर मधून सुरूवात.

अखिल भारतीय सरपंच परिषदेचा पर्यटन अभ्यास दौऱ्याला चंद्रपूर मधून सुरूवात.

अखिल भारतीय सरपंच परिषदेचा पर्यटन अभ्यास दौऱ्याला चंद्रपूर मधून सुरूवात.

 

  ✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 7498975136

चंद्रपूर/राजुरा :--  आदर्श गावांची प्रेरणा घेऊन गावागावात सरपंचांनी ग्रामविकास साधावा या संकल्पनेतून अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वात राज्यातील आदर्श गावांच्या पर्यटन अभ्यास दौऱ्यास सुरुवात झाली आहे. सदर अभ्यास दोऱ्याचा पहिला मान चंद्रपूर सरपंच संघटनेला मिळालेला असून सरपंच संघटनेच्या वतीने राज्यातील आदर्श ग्राम पाटोदा, हिवरेबाजार, राळेगणसिद्धी सोबतच बारामती तालुक्यातील आदर्श गावांना भेटी देण्यात येणार आहे. सोबतच पुणे येथील जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग सचिन घाडगे यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी सरपंचांना मिळणार आहे अशी माहिती उद्घाटन प्रसंगी राज्याचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांनी दिली. श्रीक्षेत्र आळंदी येथील राजेश मल्टीपर्पज सभागृह येथे सदर उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच संघटनेचे विदर्भ प्रमुख ॲड देवा पाचभाई, पुणे जिल्हा अध्यक्ष उज्वला गोकुळे, विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा. राजेंद्र कराडे, जिल्हा सचिव रत्नाकर चटप, ॲड. रुपेश ठाकरे, गोंडपिपरी तालुकाध्यक्ष देविदास सातपुते, घरी जाऊन तालुकाध्यक्ष विनोद निखाडे, अनिता पिदुरकर, मुक्ता ठाकरे, अनिल ठीकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सदर सरपंच पर्यटन दौऱ्यामध्ये सरपंचांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन राज्यातील आदर्श गावाचा अभ्यास करावा चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंच संघटनेचे काम अतिशय चांगले असल्याचेही शशिकांत मोरे यांनी यावेळी सांगितले. सोबतच पंढरपूर पंचायत समिती यशोदा ट्रेनिंग सेंटर पुणे आधी ठिकाणाला भेटी देण्यात येणार आहे याची सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यातून झालेली असून महाराष्ट्रातील विविध ठिकाणांचा दौरा चंद्रपूर जिल्हा सरपंच परीषद करीत आहे. यामध्ये जिल्ह्यातील कोरपना, चिमूर, सिंदेवाही, वरोरा चंद्रपूर, गोंडपिंपरी तालुक्यातील 55 सरपंचांनी सहभाग घेतला आहे. सरपंच दोऱ्याचा पहिला मान चंद्रपूर जिल्ह्याला मिळाला हे आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. विदर्भातील अमरावती, गडचिरोली, यवतमाळ आदी जिल्ह्यातील पर्यटन दौरे याप्रमाणे आयोजित केली जाणार आहे आणि यातून सरपंचांना गावासाठी काम करण्याची नवीन प्रेरणा मिळणार आहे. सोबतच सरपंचाच्या समस्यांविषयी यातून चर्चा केली जाणार आहे. अॅड. देवा पाचभाई विदर्भ प्रमुख अखिल भारतीय सरपंच परिषद 11 फेब्रुवारी रोजी चंद्रपुरात जिल्हास्तरीय सरपंच मेळावा सरपंच परिषदेचे संस्थापकअध्यक्ष जयंत पाटील राहणार उपस्थित. धनोजे कुणबी समाज संघटनेच्या वतीने चंद्रपूर येथे आयोजित कृषी प्रदर्शनी महोत्सवात जिल्हास्तरीय सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार आहे अशी माहिती सरपंच संघटनेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई, जिल्हाध्यक्ष प्रा. राजेंद्र कराडे यांनी दिले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...