Home / चंद्रपूर - जिल्हा / बल्लारपूर / महाराष्ट्र चंद्रपूर...

चंद्रपूर - जिल्हा    |    बल्लारपूर

महाराष्ट्र चंद्रपूर *बल्लारपूर ओवर ब्रिज रेल्वे अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करून मागण्या पूर्ण करा:- राजु झोडे* *रेल्वस्थानकाची पाहणी करण्यासाठी आलेल्या समितीने थातूरमातूर पाहणी करून अपघातग्रस्तांच्या समस्यांकडे पाठ फिरवल्याचा उलगुलान संघटनेचा आरोप*

महाराष्ट्र चंद्रपूर    *बल्लारपूर ओवर ब्रिज रेल्वे अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करून मागण्या पूर्ण करा:- राजु झोडे*    *रेल्वस्थानकाची पाहणी करण्यासाठी आलेल्या समितीने थातूरमातूर पाहणी करून अपघातग्रस्तांच्या समस्यांकडे पाठ फिरवल्याचा उलगुलान संघटनेचा आरोप*

 

 

*बल्लारपूर:-* काही दिवसापूर्वी बल्लारपूर रेल्वे स्थानकात रेल्वे ब्रिजचा मोठा अपघात झाला त्यामुळे काहींचा जीव गेला व कित्येक जण गंभीर जखमी होते. हा अपघात रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाला. देशात क्रमांक पटकावल्यानंतर सुद्धा रेल्वेस्थानकाचा पूल कोसळल ही अतिशय निंदनीय बाब आहे यामुळे रेल्वेचे व येथिल लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे निवेदनाच्या माध्यमातून केली.

   या घटनेचे गांभीर्य फार मोठे असून रेल्वे प्रशासन मृतकांच्या कुटुंबाकडे व जे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. निवेदनाच्या माध्यमातून राजू झोडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मृतकाच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात यावी तसेच मृतकाच्या कुटुंबाला चाळीस लाख रुपये सानुग्रह मदत देण्यात यावी. गंभीर जखमींना १५ लक्ष रुपये सानुग्रह मदत देण्यात यावी. जखमी संपूर्ण बरा होवेपावेतो त्याचा खाजगी दवाखान्यात उपचारीसाठीचा सर्व खर्च रेल्वे प्रशासनाने करावा. ज्याप्रमाणे बल्लारपूर रेल्वे स्टेशनच्या सौंदर्य करण्याची जबाबदारी स्वीकारून वाहवाही मिळवली त्याप्रमाणे दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री व मंत्री पदाचा राजीनामा द्यावा. NRUCC,ZRUCC,DRUCC सदस्य बरखास्त करून त्यांची चौकशी करण्यात यावी. बल्लारपूर रेल्वे स्टेशन महत्त्वाचे जंक्शन असून रेल्वे पोलीस चौकी आहे परंतु त्यात पुरेसे अधिकारी नाहीत. बल्लारपूर रेल्वे पोलीस स्टेशन बनवण्यात यावे तसेच या अपघातात गंभीर जखमी बिंदू रैदास यांच्या डिस्चार्ज नंतरचा संपूर्ण खाजगी दवाखान्यातील खर्च रेल्वे प्रशासनाने करावा. अशी उलगुलान कामगार संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. रेल्वे प्रशासनाला निवेदन देताना उलगुलान कामगार संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, संपत कोरडे,श्यामभाऊ झिलपे,जयदास भगत,मनोज रोहिदास, अनुराग खरतड आदि कार्यकर्ता उपस्थित होते.

 

 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधि विनोद दुर्गे  7719928001

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

बल्लारपूरतील बातम्या

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी*

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

बल्लारपुर-: पद संभालते ही थानेदार कि बडी कारवाई

... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...