वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
*गडचिरोली येथे स्थायी सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय देण्याची मागणी*
*राज्याचे उच्च शिक्षण संचालक यांचेशी गोंडवाना यंग टीचर्स संघटनेच्या शिष्टमंडळाची चर्चा*
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर/राजुरा :-- नागपूर विद्यापीठाचे विभाजन होऊन विशेष बाब म्हणून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यासाठी निर्माण केलेल्या गोंडवाना विध्यापिठाला आज मितीला 12 वर्षे पूर्ण झाली असून स्थायी सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय नसल्याने संस्था व महाविध्यालयीन प्रशासकीय कामकाजासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनने गडचिरोली येथे स्थायी सहसंचालक कार्यालाय निर्माण करण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवलणकर यांचे कडे केली आहे.
या संदर्भात गोंडवाना यंग टीचर्स संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्याचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. शैलेंद्र देवलणकर यांच्याशी सविस्तर चर्चा करून आपली भूमिका मांडली आहे. या संदर्भात डॉ.देवलणकर यांनी संघटनेची मागणी रास्त असल्याचा मनोदय व्यक्त करून यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याचा विश्वास दिला आहे.
सद्यस्थितीत नागपूर येथे सहसंचालक उच्च शिक्षण कार्यालय असल्यामुळे गोंडवांना परिक्षेत्रातील जिवती, कोरपना, भामरागड, अहेरी, एटापल्ली, आलापल्ली, कुरखेडा, कोरची, सिरोंचा, गोंडपीपरी, पोम्भूर्ण या आदिवासी, दुर्गम व ग्रामीण नक्षलग्रस्त भागातील महाविद्यालयांना प्रशासकीय कामासाठी नागपूर येथे जावे लागते त्यामुळे त्यांना नाहक शारीरिक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रात एकूण 212 महाविद्यालय असून 79 महाविद्यालय अनुदानावर आहे या ठिकाणी केवळ 53 महाविद्यालयात नियमित प्राचार्य असून प्राचार्याच्या 159 जागा रिक्त आहे तसेच एकूण नियमित प्राध्यापक 1054 असून घड्याळी तासिकेवर 1563 प्राध्यापक कार्यरत असून प्राध्यापकाच्या 1445 जागा रिक्त आहेत
या पार्श्वभूमीवर चंद्रपूर व गडचिरोली भागातील महाविद्यालयांना प्रशासकीय कामासाठी नागपूर येथे जावे लागत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर गडचिरोली येथे स्थायी सहसंचालक कार्यालय व्हावे ही जोरकस मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने डॉ. शैलेंद्र देवलणकर यांचे कडे केली असून या शिष्टमंडळामध्ये यंग टीचर संघटनेचे अध्यक्ष व सिनेट सदस्य डॉ. संजय गोरे, संघटनेचे विभाग समन्वयक डॉ.राजेंद्र मुद्दमवार, प्रा.अनिल खेडकर, प्रा. मस्के यासह सर्व सदस्यांनी केली आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...