Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / शासकीय वैद्यकीय महाविद्यालय...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ECRP-2 निधी अंतर्गत खरीदी करण्यात आलेल्या नवजात व्हेन्टीलेटर मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ECRP-2 निधी अंतर्गत खरीदी करण्यात आलेल्या नवजात व्हेन्टीलेटर मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार

समंधित वैद्यकीय अधीकारी यांनी केला भ्रष्टाचार यांची तक्रार चंद्रपूर पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर, सचिव वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुबंई व आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुबंई यांच्या कडे करण्यात आली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिष्ठता डॉ. अशोक नितनवरे व प्राध्यापक विभाग प्रमुख डॉ.मिलिंद कांबळे यांच्यावर विभागीय चौकशी करून नौकरीतून निलंबित करून फौंजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रार उमेश तपासे यांनी केली आहे.

 

 

चंद्रपूर :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ECRP-2 निधी अंतर्गत खरीदी करण्यात आलेल्या नवजात व्हेन्टीलेटर व इतर साहित्य सामुग्री मध्ये भ्रष्टाचार झाल्याची धाकादायक माहिती माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत पुढे आली असून या भ्रष्टाचार मध्ये 7 लाखाचे व्हेन्टीलेटर 25 लाखात खरीदी केल्याची बाब पुढे आली हा भ्रष्टाचार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिष्ठता डॉ. अशोक नितनवरे व प्राध्यापक विभाग प्रमुख डॉ.मिलिंद कांबळे यांनी केल्याची माहिती तक्रार कर्ता उमेश तपासे यांनी आमच्या मध्यमंशी बोलतांना दिली आहे.

 

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे गोरगरिब जनतेचा उपचारासाठी कार्यरत सरकारी संस्था असून या सरकारी मेडिकल कॉलेज ला केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार गरीब रुग्णांचा सोईसाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असते. असाच करोडो रुपयांचा निधी चंद्रपूर जिल्हा परिषद च्या मध्यमातून म्हणजे ECRP-2 निधी अंतर्गत नवजात व्हेंटिलेटर, 42 रुग्ण पलंग, व इतर साहित्य समुग्री खरीदी करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेनी ECRP-2 निधी अंतर्गत जवळपास अंदाजे 2 करोड 60 लाख रुपयांचा निधी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी उपलब्ध करून दिला पण या निधी मध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या मध्यमातून पुढे आला असून यात वैद्यकीय अधिकारी व समंधित कंत्राटदार यांनी मिळून भ्रष्टाचार केल्याचे गंभीर बाब पुढे आली आहे. जात 7 लाख किमतीचे व्हेंटिलेटर 25 लाखात तर इलेक्टिक रुग्ण पलंग मैनवल सुरूपात खरीदी करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार या प्रकरणात केला गेला असून समंधित कंत्राटदार व वैद्यकीय अधिकारी यांच्यावर विभागीय चौकशी करून नौकरीतून निलंबित करून फौंजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रार व मागणी उमेश तपासे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...