आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
माळी समाज, स्वराज्य आधार फाऊंडेशनतर्फे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती व बालिका दिन साजरा
( सय्यद शब्बीर जागीरदार )
राजुरा :
सावित्रीबाई फुले यांचे कार्य व त्यांनी केलेला संघर्ष नव्या पिढीतील महिलांसाठी प्रेरणादायी आहे असे मत आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.
माळी समाज, स्वराज्य आधार फाउंडेशन राजुरातर्फे कन्नमवार सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंती व बालिका दिन कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून माजी आमदार वामनराव चटप, मार्गदर्शक म्हणून समीर लेनगुरे, इंजि. नीलेश बेलखेडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक अरुण धोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य नानाजी आदे, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष सतीश धोटे, प्राचार्य किशोर उईके, ज्योती शेंडे, सविता वाढई, अमोल राऊत, दिनेश पारखी, आशीष करमनकर, रवी शेंडे, दुधे, स्वप्नील मोहूर्ले उपस्थित होते.
ज्या सावित्रीबाईंनी समाजाचा छळ, अपमान सहन करून स्त्री शिक्षणाचे दार खुले केले. त्या सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत मुलींनी शिक्षणाची कास धरावी. सध्याचे स्पर्धेचे युग आहे. मुलींनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी केले.
यावेळी समाज प्रबोधन व विद्यार्थी युवा संवाद कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांची भव्य मिरवून काढण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. समीक्षा जीवतोडे या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली. समीर लेनगुरे, इंजि. निलेश बेलखेडे, प्राचार्य किशोर उईके, समीक्षा जीवतोडे, विशाल शेंडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रतीक्षा वासनिक हिने केले. संचालन विशाल शेंडे यांनी, तर आभार मंजू शेंडे यांनी मानले. आयोजनासाठी माळी समाज, स्वराज्य आधार फाउंडेशनच्या पदाधिकारी, सदस्यांनी सहकार्य केले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...