वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस : शहराकरीता नवीन पाणीपुरवठा योजना आणि भुयारी गटारी योजना व रस्ते, इतर विकास कामे मंजूर करण्याची मागणी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून केली होती.
नागपूर येथील विधानसभेच्या अधिवेशना दरम्यान पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व घुग्घुस शहराच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली व निवेदन दिले.
चंद्रपूर जिल्ह्यातील अग्रणी औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या घुग्घुस शहराची लोकसंख्या जवळपास ४० हजार असून शहराला नगर परिषदेचा दर्जा प्राप्त झाला आहे. यापूर्वी घुग्घुस येथे ग्रामपंचायत असल्यामुळे शहरात ४० लिटर प्रतिमानशी प्रतिदिन या दराने पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आली होती. तीच योजना आजही अस्तित्वात आहे.
शहराचे वाढते औद्योगिकरण आणि त्या माध्यमातून झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आदि कारणांमुळे स्थानिक पाणीपुरवठा योजना अपुरी पडत आहे. त्यामुळे शहराला प्रतिदिन लागणाऱ्या एकूण पाण्याची आवश्यकता बघता येथे १३५ लिटर प्रतिमानसी प्रतिदिन अश्या पाणीसाठ्याच्या नव्या पाणीपुरवठा योजनेची अत्यंत आवश्यकता भासत आहे सोबतच शहरवासीयांचे आरोग्य व पर्यावरण संतुलन अबाधित ठेवण्यासाठी घुग्घुस शहरात भुयारी गटार योजनेची देखील अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे.
दोन्ही योजनांकरीता अमृत २.० कार्यक्रमांतर्गत डीपीआर बनविण्याचे काम प्रगतीपथावर असून एका महिन्यात पाणीपुरवठा योजनेचे डीपीआर शासनाकडे सादर करण्यात येईल. तसेच भुयारी गटार योजनेचे डीपीआर तयार करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. दोन्ही कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करून घुग्घुस वासीयांच्या मूलभूत सोईसुविधांमध्ये भर घालण्याकरीता निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागणी मंजूर केली आहे.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे संजय तिवारी, सिनू इसारप, साजन गोहने, अमोल थेरे, मानस सिंग, विवेक तिवारी, सुरेंद्र भोंगळे, प्रवीण सोदारी व मंगेश मडेश्वर उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...