वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
आज पासून शेनगाव येथे "ग्राम महोत्सव"
सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सव निमित्य विविध कार्यक्रमांची रेलचेल
चंद्रपूर प्रतिनिधी
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर:- चंद्रपूर तालुक्यातील शेणगाव येथे ग्रामपंचायत ने दिनांक 3 जानेवारी ते 12 जानेवारी या सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सव निमित्त ग्राम महोत्सवा चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शेनगावच्या सरपंच पुष्पाताई मालेकर करणार आहे.
शेणगाव हे गाव गेल्या दोन दशकापासून विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यावसायिक चळवळीचे केंद्रस्थान बनले आहे. गावात वर्षभर विविध उपक्रमातून समाजाचे प्रबोधन करून कृती कार्यक्रम सुरू आहे, प्रत्येक ग्रामस्थांचा श्वाश्वत विकास व्हावा या हेतूने यावर्षीपासून ग्रामपंचायत ने ग्राम महोत्सवा चे आयोजन दिनांक 3 जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंत केले आहे. 4 जानेवारी ला धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर ताडाळी यांच्यामार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषध वाटप होणार आहे, तर ५ जानेवारीला जिल्हा परिषद शाळा शेनगाव येथे विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा तर ६ जानेवारीला मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली तरी. ७ जानेवारीला महिलांच्या गुणांना वाव मिळावा याकरिता विविध स्पर्धां चे आयोजन तथा आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्याकरता चंद्रपूर येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ यांचे मार्गदर्शन राहणार आहेत
८जानेवारीला शेणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील आजी-माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आणी चंद्रपूरची प्रसिद्ध उद्योजक तथा मराठा उद्योजक परिषद चे जिल्हाध्यक्ष संतोष कुचनकर मार्गदर्शन करणार आहे. 9 जानेवारीला शेतकऱ्यांच्या शेती विषयक मार्गदर्शन व विविध शासकीय योजनांची आल्यास देण्याकरता चंद्रपूर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गजानन हटवार आणि तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे यांचे मार्गदर्शन करणार आहे. 10 जानेवारी ला श्री. गुरुदेव सेवा मंडळ च्या वतीने भव्य भजन संमेलना चे आयोजन करण्यात आलेले आहे, तर दिनांक 11 जानेवारीला शेणगावतील सर्व विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. 12 जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव तथा विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करून या ग्राम-महोत्सवांचा समारोप होणार आहे.
तरी या ग्राम-महोत्सवामध्ये तालुक्यातील आणि शेणगावातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शेनगावच्या सरपंच पुष्पाताई मालेकर यांनी केले आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...