Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / पोलीस पाटलांच्या मागण्यांवर...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

पोलीस पाटलांच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा : पोलीस पाटील मोर्चाला संबोधित करताना आमदार सुभाष धोटे यांचे प्रतिपादन.

पोलीस पाटलांच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा :    पोलीस पाटील मोर्चाला संबोधित करताना आमदार सुभाष धोटे यांचे प्रतिपादन.

भारतीय वार्ता 

   चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी✍️दिनेश झाडे

 

चंद्रपूर/राजुरा  :-- पोलीस पाटील हे पद शासन, प्रशासन व जनता यांच्यामधील अत्यंत महत्वाचा दुवा आहे. गावामध्ये कायदा, सुव्यवस्था, जातीय सलोखा राखणे, नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य करणे, शासकीय अभियानात प्रत्यक्ष सहभाग, अवैध्य धंद्याना प्रतिबंध करणे, गावातील सण उत्सव शांततेत पार पाडणे अशी अतिशय महत्त्वाची भूमिका ते बजावित असतात. त्यामुळे त्यांच्या मागण्या रास्त असून सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी राज्यातील पोलीस पाटील मोर्चाला संबोधित करताना राज्य सरकारकडे केली आहे.

        या प्रसंगी मोर्चेकऱ्यांनी पोलीस पाटीलांचे मानधन दरमहा किमान रु. १८ हजार रुपये करावे, निवृत्तीचे वय ६० वर्षावरुन ६५ वर्षापर्यंत करावे,  निवृत्ती नंतर किमान ५ लाख रुपये ठोस रक्कम मिळावी, ग्राम पोलीस अधिनियम १९६७ मध्ये दुरुस्ती करण्यास प्राधान्य देण्यात यावे, नुतनिकरण पहिल्या पाच वर्षानंतर पुढे कायमचे बंद करावे,  गृह व महसुल विभागातील पद भरती व त्यांना ५ % आरक्षणाचा लाभ मिळावा, शासनातर्फे ५ लाख रुपयाचा विमा उतरवण्यात यावा, त्याचे हप्ते शासनातर्फे भरण्यात यावे, शासनाकडुन त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मेडिक्लेम मिळावा, प्रवास भत्ता व स्टेशनरी साहित्य खर्चासाठी दरमहा ३ हजार रुपये मानधन मिळावे, पोलीस स्टेशन व पोलीस चौकी असलेल्या व नव्याने शहरीकरण झालेल्या गावातील कार्यरत पोलीस पाटीलांना त्यांच्या निवृत्तीकाळा पर्यंत कायम ठेवण्यात यावे, त्यांची पदे खंडित करु नयेत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन त्या पुर्ण कराव्यात असे मत आ. धोटे यांनी केले   या प्रसंगी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, नागपूर विभाग कार्यकारी अध्यक्ष हरिभाऊ पहानपटे, चंद्रपूर जिल्हा सचिव विजय पाध्ये, राजुरा तालुका अध्यक्ष बाळकृष्ण पिंगे, तालुका उपाध्यक्ष धर्मराज उरकुडे, तालुका सचिव संजय रेगुंटावार, सतीश राठोड, धनपाल उपरे, उमेश देठे, जितेंद्र जिवणे, आनंद नगराळे, सुवर्णा कावळे, निता खणके, पपिता भसारकर यासह महाराष्ट्रातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...