Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / गोंडवाना विद्यापीठाच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

गोंडवाना विद्यापीठाच्या अमृत क्रीडा व कला महोत्सवात शिक्षकांना सहभागी करा

गोंडवाना विद्यापीठाच्या अमृत क्रीडा व कला महोत्सवात शिक्षकांना सहभागी करा

गोंडवांना विध्यापिठ यंग टीचर्स ची कुलगुरू कडे मागणी

दिनेश झाडे (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी): राजुरा  :-- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या वतीने दिनांक 27ते 29 जानेवारी2023  या कालावधीमध्ये अमृत क्रीडा व कला महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे.मात्र या महोत्सवामध्ये विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकांच्या सहभाग नसल्याने गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स अससोसिएशनने कुलगुरू कडे शिक्षकांचा सदर महोत्सवात सहभाग करण्यासंबंधी एका पत्रकान्वये मागणी केली आहे.

महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांच्यामध्ये खेळाप्रती उत्साह निर्माण व्हावा या उदात्त हेतूने  गोंडवाना विद्यापीठाने अमृत क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन केलेले आहे या संबंधात केवळ विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता गो.वि.ग.511/2022 दि.9-12-2022 अन्वये विद्यापीठाने सहभागाबाबतचे पत्र निर्गमित केले मात्र या महोत्सवांमध्ये विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकांचा सहभाग नसल्याने संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांमध्ये नाराजी पसरली असून अनेक गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील अनेक महाविद्यालयातील शिक्षकांनी गोंडवांना यंग टीचर्स संघटनेकडे  सदर महोत्सवात शिक्षकांचा सहभाग असावा याबाबत निवेदन दिले असून या पार्श्वभूमीवर   गोंडवाना यंग टीचर असोसिएशनने एका पत्रकाद्वारे सदर अमृत क्रीडा व कला महोत्सवात शिक्षकांचाही सहभाग करावा अशी मागणी केली आहे.

अमृत क्रीडा व कला महोत्सव करिता क्रिकेट, व्हॉलीबॉल, दौड स्पर्धा खो खो,रस्साखेच,कबड्डी व संगीत खुर्ची या क्रीडा प्रकारात सहभागी होण्याचे आवाहन केले असून कला प्रकारांमध्ये समूहव एकल गीत गायन तसेच समूह वएकच नृत्य तथा लघुनाटिका या प्रकाराचा समावेश केलेला आहे मात्र या क्रीडा महोत्सवामध्ये शिक्षकांच्या सहभागाबाबत कुठलाही उल्लेख नाही व याबाबत  विद्यापीठाचे कुठलेही पत्र नसल्यामुळे गोंडवांना यंग टीचर चे अध्यक्ष व सिनेट सदस्य डॉ. संजय गोरे व सचिव व सिनेट सदस्य डॉ.विवेक गोरलावार यांनी एका पत्रका द्वारे सदर महोत्सवांमध्ये शिक्षकांचा सहभाग करावा अशी मागणी कुलगुरूकडे केली आहे.

 

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...