खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :गजेंद्र काकडे
चंद्रपूर :
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर, सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच, चंद्रपूर द्वारा आयोजित विदर्भ साहित्य संघाचे स्व. मनोहरराव म्हैसाळकर स्मृती ६८वे विदर्भ साहित्य संमेलनाचे आज (दि.१६) ला स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात थाटात उद्घाटन झाले.
या निमित्ताने काही विशेष व ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात
डॉ. अशोक श्रीहरी जीवतोडे (विदर्भवादी ओबीसी नेते) यांच्या शैक्षणिक, सामाजीक, सांस्कृतिक कार्याचा सत्कार राज्याचे सांस्कृतिक मंत्री मान. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.
या निमित्ताने सत्कारानंतर अनौपचारिक चर्चे दरम्यान डॉ. अशोक जीवतोडे यांचेसह वार्तालाप करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, ६८वे विदर्भ साहित्य संमेलनाचे निमित्ताने संमेलनात, 'स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे', करीता ठराव घेण्यात यावा. म्हणजे पुढले विदर्भ साहित्य संमेलन हे विदर्भ राज्यातच होईल, या करीता राज्य शासनास ठराव पाठवून पाठपुरावा करावा. सोबतच विदर्भात ६०% ओबीसी समाज आहे. ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात साहित्यिक आहेत. या ओबीसी समाजाचे उत्थान व्हावे, त्यांचे संवैधानिक, न्याय हक्क व अधिकार त्यांना मिळावेत, या करीता ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी, याकरीताही या संमेलनात मंथन व्हावे, तथा ठराव पारीत करावा. सोबतच सध्या राज्यात व देशात संवैधानिक व राजकीय पदावर असलेले अनेक जण राज्यातील व देशातील थोर-महात्म्या विरोधात चुकीचे व दिशाभूल करणारे वक्तव्य करतात. अशा समाजविघातक प्रवृत्ती व विचारांविरोधात संमेलनात मंथन व्हावे. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांच्या निषेध ठराव घेण्यात यावा.
डॉ. अशोक जीवतोडे हे विदर्भ राज्य पुरस्कर्ते व ओबीसी चळवळीतील अग्रणी आहेत. त्यांनी मागील अनेक वर्षांपासून या चळवळीच्या माध्यमातून विदर्भ व ओबीसी प्रश्नांवर आवाज बुलंद केलेला आहे, हे विशेष.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...