वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
दिनेश झाडे (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी) राजुरा :-- महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. या बेताल विधानाच्या विरोधात राजुरा येथे भाजप सोडून सर्व पक्ष, सर्व पुरोगामी, बहुजनवादी, सामाजिक संघटना, महिला काँग्रेस यांच्या वतीने संविधान चौक राजुरा येथे उपस्थित राहून निषेध आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन सर्व महापुरुषांचा जयघोष करुन संकल्पबद्ध होत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या पाटीलांचा निषेध करण्यात आला. पोलिस स्टेशन राजुरा येथे तक्रार नोंदविण्यात आली. शेवटी राजुराचे तहसिलदार हरीश गाडे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. मंत्री चंद्रकांत पाटीलांवर सामाजिक एकता भंग करून समाजात, राज्यात, देशात तेढ निर्माण करीत असल्याबद्दल कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. संविधान चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा निषेध मोर्चा काढण्यात आला. महिला काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेऊन मंत्री पाटलांचा निषेध नोंदविला.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नेतृत्वात महिला काँग्रेस ने मोठय़ा प्रमाणात सहभाग नोंदविला. या प्रसंगी नंदकिशोर वाढई, अॅड चंद्रशेखर चांदेकर, अॅड. मारोती कुरवटकर, मंगेश गुरणुले, ईरशाद शेख, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्या चांदेकर, पुनम गिरसावळे, ज्योती शेंडे, संगीता मोहुर्ले, इंदूताई निकोडे, उज्वला कातकर, सुमित्रा कुचनकर यासह सर्व पक्षीय, सर्व पुरोगामी, बहुजनवादी, सामाजिक संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...