Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा...

महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा...

बहुजनवादी सामाजिक संघटना तालुका राजुरा तथा राजकीय पक्षांची मागणी

राजुरा: तहसीलदार राजुरा मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर ; पोलीस ठाणे राजुरा येथे गुन्हा नोंद करून कडक कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्ते अमोल राऊत यांची मागणी

 

         

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील संभाजीनगर येथील कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह व बेताल विधान करून राज्यातील व देशातील ऐक्य, एकात्मता व सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याने हे वक्तव्य देशविघातक व देशद्रोही असून घटनेतील तरतुदींचे उल्लंघन करणारे आहे. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.

 

तीनही महापुरुष भारतातील थोर समाजसुधारक असून त्यांनी केलेले कार्य देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. सध्या राज्यात आरएसएस प्रणित गुंड प्रवृत्तीच्या व्यंक्तींकडून देशातील बहुजन समाजाच्या भावना दुखावण्यात येत आहेत. यामुळे राज्यातील वातावरण तापवण्याचे षडयंत्र सत्ताधाऱ्यांचे दिसून येत आहे. यामुळे अशा प्रवृत्तीवर आळा घालून एकात्मता अखंडित राखण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, तसेच सामाजिक सौहार्द बिघडल्यास याची सर्व जबाबदारी गैरअर्जदार यांची राहील असा इशाराही पोलीस ठाणे यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

 

यावेळी राजुरा शहरातील संविधान चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा पर्यंत मोर्चा काढून निषेध आंदोलन करण्यात आले. पोलीस ठाणे व तहसील कार्यलयात निवेदन देण्यात आले. काँग्रेस, राष्ट्रवादी कँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघटना, RPI गवई गट, भारतीय बौद्ध महासभा (राजुरा, रामपूर, बामणवाडा), गोंडवाना गणतंत्र पार्टी राजुरा, मराठा सेवा संघ राजुरा, नागवंश युथ फोर्स, समता सैनिक दल आदी राजुरा तालुक्यातील सर्व बहुजनवादी सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यात हिरीरीने सहभाग घेत निषेध नोंदविला.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...