वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :
---------------^-----------
व्यक्तिमत्व घडविणारे ब्रेन प्रोग्रामिंग कुटुंब, शाळा, शेजारी, वाचन, अनुभव आणि सामाजिकरणातून होत असते. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, मानवी मूल्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करून आपले व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी सतत प्रयत्न केल्यास निश्चित एक विकसित पिढी देशात निर्माण होईल, त्यासाठी संतांचा आणि समाजसुधारकांचा सामाजिक, वैज्ञानिक विचार समजून घेऊन, आचरणात आणणे गरजेचे आहे. असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या युवा शाखेचे महाराष्ट्र राज्य संघटक मा. पंकज वंजारे यांनी व्यक्त केले.
*या कार्यशाळेत त्यांनी आपण कसे घडतो, संवाद कौशल्य, अभ्यासाचे तंत्र, वैज्ञानिक दृष्टिकोन, व्यक्तिमत्व घडवीणारे ब्रेन प्रोग्रामिंग,आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन,संतांचे आणि समाज सुधारकांचे सामाजिक विचार, मोबाईलच्या अतिरिक्त वापराचे धोके,आणि उपाय यासह विविध विषयांवर अत्यंत प्रभावी पद्धतीने विविध उदाहरणांसहित सखोल मार्गदर्शन केले.*
> *ब्रम्हपुरी येथे 3 व 4 डिसेंबर 2022 ला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा ब्रम्हपुरी आणि प्रेरणा फाउंडेशन ब्रम्हपुरी यांच्याद्वारे झाडे मिटिंग हॉल येथे व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा संपन्न झाली .*
3 डिसेंबरला कार्यशाळेचे उदघाटन ॲड. गोविंदराव भेंडारकर अध्यक्ष अभा अंनिस जिल्हा चंद्रपूर यांनी केले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थी जीवनात अशा कार्यशाळांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे मत मांडले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बांधकाम व्यावसायिक मान. प्रेमलाल धोटे,भाऊराव राऊत संयोजक प्रेरणा फाऊंडेशन,डॉ मनीषा बनवाडे उपाध्यक्ष अभा अंनिस ब्रम्हपुरी हे उपस्थित होते . *या कार्यशाळेत ब्रम्हपुरीतील आणि विविध गावातील 125 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.*
*कार्यक्रमाचे संचलन प्रा बालाजी दमकोंडवार यांनी केले.*
04 डिसेंबरला कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात डॉ खिजेंद्र गेडाम अध्यक्ष अभा अंनिस शाखा ब्रम्हपुरी, यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास यावर मौलिक मार्गदर्शन केले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री जगदीश(मोंटू) पिलारे, प्रा. विजय मुडे, प्रा. बालाजी दमकोंडवार, संघटक अभा अंनिस ब्रम्हपुरी, कु प्रियंका दिघोरे युवा संघटक ब्रम्हपुरी हे उपस्थित होते.
*याप्रसंगी कार्यशालेबद्दल सहभागी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन कु. सुहानी कामडी हिने केले आणि आभार प्रदर्शन वैभव तलमले यांनी केले.*
*कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अभा अंनिस ब्रम्हपुरीचे संघटक बालाजी दमकोंडवार/प्रेरणा फाउंडेशनचे संयोजक भाऊराव राऊत,मुनिराज कुथे,/रक्तवीर सेनाचे अध्यक्ष निहाल ढोरे/ तसेच वैभव तलमले,निहाल ढोरे,स्वप्नील राऊत,रंजित तोंडरे,महेश चौधरी यांनी परिश्रम घेतले.*
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...