Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / जिवती च्या क्षयरोगींना...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

जिवती च्या क्षयरोगींना सेवा कलश फाऊंडेशनची मदत. अभिजीत धोटे यांच्या हस्ते क्षयरोग रुग्णांना सकस आहार किटचे वितरण.

जिवती च्या क्षयरोगींना सेवा कलश फाऊंडेशनची मदत.    अभिजीत धोटे यांच्या हस्ते क्षयरोग रुग्णांना सकस आहार किटचे वितरण.

 

 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

   ✍️दिनेश झाडे

 

चंद्रपूर/जिवती :-- महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील अतिदुर्गम व आदिवासी बहुल जिवती तालुक्यातील पाटण, शेणगाव आणि जिवती या प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन सेवा कलश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत धोटे यांनी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची विशेषतः क्षयरोगाचे रूग्ण या विषयी माहिती जाणून घेतली व सेवा कलश फाऊंडेशनच्या वतीने परिसरातील क्षयरोगाचे रूग्णांना सकस आहार पुरविण्याचा संकल्प केला.

          जिवती तालुक्यात सार्वजनिक आरोग्य विभाग व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत आयोजित जिवती तालुक्यातील क्षय रोग निर्मूलनाकरिता जन सहभागातून अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये एक हात मदतीचा म्हणून क्षय रोग पीडित रुग्णांना ६ महिन्यापर्यंत सकस आहार देण्याचा संकल्प सेवा कलश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत धोटे यांनी घेतला आहे.

        या प्रसंगी अभिजीत धोटे यांनी सांगितले की सेवा कलश फाउंडेशन हे समाजाच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत असेल,  या परिसरातील क्षयरोगाची समस्या लक्षात घेऊन आम्ही ठरवले आहे की, क्षयरोगाचे रुग्णांना औषधोपचारासोबत सकस आहार आवश्यक असल्यामुळे जिवती तालुक्यातील पाटण, शेनगाव आणि जिवती या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रत्येकी दोन प्रमाणे एकूण सहा रुग्णांना सहा महिन्याकरिता सकस आहार किट पुरविण्याचा आमचा संकल्प आहे. त्याचाच भाग म्हणून आज क्षयरोग रुग्णांना सकस आहार किटचे वितरण करण्यात आले. यामध्ये तेल, शेंगदाणे, सोयाबीन वडी, तुरीची डाळ, मुंग डाळ, मोट इत्यादींचा समावेश आहे. तसेच समाजातील नागरिकांनी समोर येऊन अशा रुग्णांसाठी आणि परिसरातील क्षयरोग नियंत्रण करण्यासाठी त्यांच्या वतीने जमेल तेवढी मदत करायला पुढे आले पाहिजे असे आवाहन अभिजीत धोटे यांनी केले आहे.

        या प्रसंगी सरपंच सिताराम मडावी, जिवती नगर पंचायतचे उपाध्यक्ष डॉ. अंकुश गोतावडे, अश्फाक शेख, तालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील टेंभे, प्राथमिक आरोग्य केंद्र पाटणचे आरोग्य अधिकारी डॉ. छाया शेडमके, डॉ. कविता शर्मा, प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगांवचे डॉ. हबीब शेख, प्राथमिक आरोग्य केंद्र जिवतीचे डॉ. गजेंद्र अहिरकर, आरोग्य केंद्रातील कर्मचारी, परिचारिका आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...