Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / घरोघरी-गावोगावी सर्व...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

घरोघरी-गावोगावी सर्व ओबीसींनी संविधान दिन व महात्मा फुले स्मृती दिन साजरा करावा : ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

घरोघरी-गावोगावी सर्व ओबीसींनी संविधान दिन व महात्मा फुले स्मृती दिन साजरा करावा : ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

भारतीय वार्ता ( गजेंद्र काकडे )

 

चंद्रपूर :

          ओबीसींच्या न्याय हक्क व अधिकारांसाठी भारतीय संविधानात ३४० वे पहिले कलम ओबीसींसाठी नमूद करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने संविधानानेच ओबीसींना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. मात्र आजतागायत ओबीसींना त्यांचे हक्क व अधिकार कोणत्याच राज्यकर्त्यांनी मिळू दिले नाही व त्यासाठीच मागील कित्येक दशकापासून ओबीसींचा लढा सुरू आहे. सोबतच महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या जिवन कार्यातून समतेचा व न्यायाचा संदेश दिला. त्यांचा स्मृती दिन समाजातील विविध घटकांनी त्यांच्या हक्काची जाणीव जागृती होण्यासाठी साजरा करावा, यासाठी दोन्ही दिवस ओबीसी समाज बांधवांनी प्रेरीत होवून साजरे करावे.

         ओबीसी समाजबांधवांनी गावोगावी घरोघरी दिंड्या, रॅली, प्रभात फेरी, व्याख्यान, प्रबोधन, सभा, मिरवणूक आदी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठ्या जल्लोषात संविधान दिन व महात्मा फुले स्मृती दिन साजरा करावा, असे आवाहन ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले आहे.

         महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे एस.सी. एस.टी. व्ही.जे.एन.टी. व ओबीसी समूदायासाठी त्यांचे हक्क व अधिकार बहाल केले. त्यामुळेच विविधततेने नटलेल्या या देशात सर्व जात समुदायाला त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याची संधी मिळाली. हीच संधी ओबीसींना संविधानाने उपलब्ध करून दिली आहे. देशात संविधान सर्वोच्च आहे. संविधानच या देशातील प्रत्येक घटकाचे उत्थान करु शकते व करीत आहे.

          महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या कार्यातून आयुष्यभर शिक्षण, समानता, स्वातंत्र्य, अधिकार यासाठी लढा दिला. समाजात सर्वांगीण जागृती घडवून आणली. त्यांचे कार्य मोठे आहे.

          म्हणून ओबीसी समाजाने घरापासून सुरुवात करून आपआपल्या परिसरात संविधान दिन व महात्मा फुले स्मृती दिन मोठ्या उत्साहात साजरा करावा. समाजात जाणीव जागृती होईल, असे कार्यक्रम घ्यावे, असे आवाहन डॉ. अशोक जीवतोडे यांनी ओबीसी समाजबांधवांना केले आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...