वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
नौशाद शेख (विशेष प्रतिनिधि): घुग्घुस शहरात अवैध रेती तस्करी करताना एका ट्रॅक्टरला नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार यांनी गुरुवारी सकाळी पकडले असून ट्रॅक्टर मालकाला 1 लाख 15 हजारांचा दंड अंदाजे ठोठावण्यात आला आहे.विशेष म्हणजे बनावट नंबर प्लेट लावून काही ट्रैक्टरावर स्टिकर लावून ट्रॅक्टरने रेतीची अवैध वाहतूक सुरू असून, नायब तहसीलदार यांच्यासमोरच ट्रॅक्टर मालकाने बनावट नंबरचे स्टिकर काढून फेकले. त्यामुळं अनेक शंका कुशंका निर्माण होत आहे.
घुग्घुस शहरात अवैध रेतीची तस्करी रात्री सात ते आठ वाजे सुरू, असून ट्रॅक्टर द्वारे वाहतूक सुरू आहे. अशातच घुग्घुस पोलीस स्टेशनसमोरून एक ट्रॅक्टर रेतीची अवैध वाहतूक करताना आढळून आले.त्यानंतर नायब तहसीलदार यांनी त्या ट्रॅक्टरला पकडून तहसील कार्यालयात लावले. त्यानंतर ट्रॅक्टर मालक खलिल शेख याला 1 लाख 15 हजारांचा दंड अंदाजे ठोठावण्यात आला आहे.
ज्या रेती वाहतूकी होणाऱ्या ट्रैक्टरांवर स्टिकर लावून चालवित आहे त्यांना तपासनी करण्यात यावी अशी चर्चा अन्य वाहतूकांना होत असून यावर प्रश्न उपस्थित होत आहे,
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...