Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / डुकराच्या गळ्यात 'मि...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

डुकराच्या गळ्यात 'मि सुधांशु त्रिवेदी फलक लटकवून काँग्रेस तर्फे निषेध आंदोलन

डुकराच्या गळ्यात 'मि सुधांशु त्रिवेदी फलक लटकवून काँग्रेस तर्फे निषेध आंदोलन

भाजप नेत्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानास्पद वक्तव्या विरोधात काँग्रेस संतप्त

 

 

 

 

घुग्घुस : आज शहरातील छत्रपती शिवाजी चौकात दुपारी चार ते पाच वाजता घुग्घुस शहर काँग्रेस कमिटी तर्फे शहर अध्यक्ष राजुरेड्डी व किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात  संतप्त पदाधिकाऱ्यांनी मुर्दाबाद च्या घोषणा दिल्या

एका डुक्कराच्या गळ्यात 'मि सुधांशु  त्रिवेदी' असे फलक लावून अभिनव आंदोलन करण्यात आले

 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे नेते सतत अपशब्द बोलत असतात एकेरी उल्लेख करत असतात

भाजप नेते जय भगवान गोयल याने  " आज के शिवाजी' नरेंद्र मोदी पुस्तक काढीत शिवरायांची  तुलना मोदी सोबत करीत महाराजांचे एकेरी उल्लेख केला,

अहमदनगर येथील माजी उप महापौर श्रीपाद छिदंम हा अत्यंत घाणेरड्या शब्दांत महाराजां बद्दल बोलला, राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी याने रामदास नसते तर शिवरायांना कोणी विचारले नसते व आता शिवाजी महाराज हे जुन्या जमान्याचे असून नवीन युगात गडकरी आहे

असा वक्तव्य केला तर भाजप प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी याने शिवाजी महाराजांनी औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहून माफी मागितल्याचे बिनबुडाचे वक्तव्य करीत अकलेचे तारे तोडले आहे भाजप हे हेतुपूर्वक महाराजांची बदनामी करीत असल्याच्या निषेधार्थ आजचे आंदोलन करण्यात आले.

 

याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,शामराव बोबडे,तिरुपती महाकाली,शेख शम्मीउद्दीन,किशोर बोबडे, रोशन दंतालवार,रोहित डाकूर,सुकमार गुंडेटी,अविनाश गोगुर्ले,अरविंद चहांदे,देव भंडारी,कुमार रुद्रारप,जाफर शेख,किशोर धुप्पे,सुनील पाटील,साहिल सैय्यद,दीपक पेंदोर,अमित सावरकर,रफिक शेख,अंकेश मडावी,सदानंद दासरी,श्रीनिवास कलवल,अभिषेक तांडरा,कपिल गोगला,राजकुमार आडे,सोमेश रंगारी,अजय त्रिवेणी,विवेक गिरी,राकेश डाकूर,अंकुश सपाटे,शंकर नस्कुरी,सौ.पदमा त्रिवेणी, श्रीमती दुर्गा पाटील,श्रीमती संध्या मंडल,सौ.मंगला बुरांडे,लक्ष्मीबाई गोदारी,सखुबाई देशकर व मोठया प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...