खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता: गजेंद्र काकडे (प्रतिनिधी )
चंद्रपूर - नालंदा एज्युकेशन एकेडेमी नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत नवोदय परीक्षा -2023 ला बसनाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व व्यवथापनाच्या इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता पाचवीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी आयोजित एकदिवसीय जिल्हास्तरीय नवोदय परीक्षा मार्गदर्शन शिबीर भवानजीभाई चव्हाण हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय , चंद्रपूर येथे नुकतेच पार पडले .
या शिबिर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भवानजीभाई चव्हाण हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूरचे प्राचार्य तन्नीरवार होते.तर प्रमुख अतिथी शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूरचे शिक्षण विस्तार अधिकारी सावन चालखुरे ,शिक्षणतज्ज्ञ प्रा .भारत मेश्राम ,शिक्षक सि .ए .डांगे तथा तज्ज्ञ मार्गदर्शक विषयतज्ज्ञ संगिता सराफ ,रजनी हस्ते ,केंद्र प्रमुख बालाजी बावणे ,जे .के .मेश्राम व अरविंद भगत जवादे उपस्थित होते .
या शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शकांनी उपस्थित शिबिरार्थी विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षेचे स्वरूप ,परीक्षा पद्धती व भाषा ,गणित व सामान्य क्षमता चाचणीतील तंत्र -मंत्र सहित परीक्षेचा अभ्यास कसा करावा आदी विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले .या शिबिराबद्दल विदयार्थ्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्यात .
तत्पूर्वी ,या शिबिराचे उदघाट्न शिक्षण विस्तार अधिकारी सावन चालखुरे यांच्या हस्ते डा .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस दिपप्रज्वलन व माल्यार्पणने करण्यात आले .या कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक शिबीर संयोजक प्रा. भारत मेश्राम यांनी केले .या शिबिरात चंद्रपूर जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद ,खाजगी अनुदानित व कान्व्हेन्ट शाळांमधील एकंदरीत 175 विदयार्थी सहभागी झाले होते .या शिबिराची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली .
या कार्यक्रमाच्या यश्वीतेसाठी कुंदन गजभिये ,मृणालिनी गजभिये ,रजनी टेकाम आणि मायावती फेन्स क्लब ,शिवाजी बिरसा आंबेडकर युवा ब्रिगेड व आयरन लेडी स्पोर्टींग क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले .
-------------------------------------
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...