वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
,
तडाली: ग्रामसभा ही गावची संसद असल्याने गावकऱ्यांसाठी आपले विचार,मत मांडण्याचे समस्या सोडवून घेण्याचे बोलण्याचे एकमेव ठिकाण आहे. त्यामुळे ग्रामसभेला खूप महत्त्व आहे.
ग्रामसभा काढण्याचा अधिकार हा पूर्णपणे सरपंचाला असतो.यामुळे सकाळी 10 वाजता ग्रामसभा बंद सभागृहात घेतली जाते.दिवसा येथील काम करणारे मजूर, शेतकरी,कामगार आणि ड्युटी वर जाणारे लोक हे ग्रामसभेत दिवसा भाग घेऊ शकत नाही.स्त्रियांचे सकाळी घरकामे असतात.एकतर जाणून बुजून आतापर्यंत च्या सर्व ग्रामसभा सकाळी10 वाजता भरवण्यात आल्या.यामुळे सर्व ग्रामवासियाना इच्छा असून सुद्धा सहभाग घेता येत नाही.
सरपंच जास्तीत जास्त वेळेस ग्रामसभेत अनुपस्थित असतात.आमच्या विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरे न देता उद्धट बोलतात.आमच्या प्रश्नाला उत्तरे सरपंच द्यायचे अधिकार सरपंचाला असतात पण अधिकार नसताना सुद्धा ग्रामसचिव हस्तक्षेप करत मधात बोलत असतो आणि सरपंच काहीही न बोलता गप्प असते.
आज सुद्धा नोव्हेंबर च्या ग्रामसभेला सरपंच अनुपस्थित राहिल्या.लोकांना ग्रामसभा विषयी पूर्णपणे जागृत करत नाही.लोकांना अंधारात अज्ञान ठेवण्याचा प्रयत्न होत आहे.गावात नाली.रस्ते.स्वच्छ्ता,सांडपाणी व्यवस्थापन,आरोग्य,शिक्षण, पर्यावरण संवर्धन इत्यादी बाबत आमच्या गंभीर समस्या जैसे थे तैसे असल्याचे गावकरी म्हणाले.तसेच पंतप्रधान आवास योजना घरकुल संबंधी ग्रामपंचायतीने पुढे कार्यवाही केली नाही.
गावासाठी विद्युत सहाय्यक नेमणूक साठी कार्यवाही केली नाही.रेल्वे स्टेशन ताडाळी येथील कोळसा लोडिंग माल धक्का यामुळे भयंकर जीवघेणे प्रदूषण होत आहे. श्वसनाचे व त्वचेचे आजार खूप वाढत आहे.धुळीमुळे विहिरीचे पाणी प्रदूषित झाले आहे.
मच्छरांमुळे आम्हाला खूप त्रास होत आहे पण नियोजन करून योग्य उपाय योजना अजून केल्या नाही.गावात विविध समित्या गठण केले नाही. संयुक्त वनव्यवस्थापन समितीचा पैसा आराखडा बनवुन खर्च केला नाही.अश्या विविध समस्या ग्रामसभा वारंवार बरखास्त झाल्यामुळे आम्ही कोणासमोर मांडायच्या असा गावकऱ्यांनी प्रश्न केला.
हे सरपंच आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तरे देऊ शकत नसेल.उद्धट बोलत असेल आणि आमचं समस्या दुःख एकूण घ्यायलाच तयार नसेल.असा भोंगळ कारभार सुरू असल्यामुळे आम्हाला सरपंच ताडाळी यांनी ग्रामसभेत राजीनामा द्यावा.अशी मागणी करण्यात आली.
यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांनी असे मत मांडले की, आम्ही आमचे कर्तव्य पार पाडीत सर्व कामे पास केलेली आहे पण त्या कामांची अमालबजावणी करण्याचा अधिकार सरपंच व ग्रामसचिव यांना आहे.आम्ही जर काम करण्यास सांगितले तर आम्हाला ते दुर्लक्ष करतात.आमच्या वॉर्ड मधील लोक आम्हाला प्रश्न करतात कामे का नाही झाले तर याला जबाबदार असलेले हे लोक ,या गावचे नुकसान करत आहे.
आम्ही मासिक सभेत सरपंचास लेखी वारंवार अर्ज दिले की कामे सुरू करा तरीपण ते मनमर्जिने दुर्लक्ष करीत रेंगाळत आहे.असे ग्रामपंचायत सदस्यांनी यावेळी मत व्यक्त केले.तसेच सरपंचांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...